Uddhav Thackeray : 'तो' नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या..

Maharashtra Assembly Winter Session 2022 : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2022: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण आणि दिशा सँलियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हे आरोप झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे.

उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यावर सुरु असलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी सहभाग घेतला. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.या प्रश्नावर कर्नाटकाने संयम दाखवणे गरजेचं आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण उकरुन काढले आहे. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारने कर्नाटक व्याप्त भागाला केंद्रशासित प्रदेश करावे, त्यामुळे या भागावर केंद्र सरकारचे नियंत्रण राहिल,"

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहे. यावर विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी शिंदेवर हल्लाबोल केला, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. उद्याचा दिवस चांगला जावा, म्हणून ते दिल्ली वारी करीत असतात. नवस फेडण्यासाठी त्यांची दिल्लीवारी सुरु आहे," असा टोला ठाकरेंनी मु्ख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Eknath Shinde
Pune News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली गिरीश बापटांची भेट..

"सरकारने शेतकऱ्यांना उघड्यावर सोडले आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्री हे हिंदुत्व माणनारे आहेत, त्यामुळे ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं, याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं, की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊद्या म्हणून नवस करतोय, यासाठी त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत, यात महाराष्ट्राचं भलं कुठे आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

"सीमाभागातील मराठी माणसांवर कानडी भाषेंचा अन्याय झाला आहे. तेथे सगळे व्यवहार कानडी भाषेत होतात. कर्नाटकनं हा अत्याचार थांबवावा. आम्हाला कर्नाटकची एक इंचही जागा नको, पण आमच्या हक्काची जागा आम्हाला हवी आहे. न्यायालयाचे त्याची दखल घ्यायला पाहिजे," असे ठाकरे म्हणाले.

विधानपरिषदेत आज उद्धव ठाकरेंनी एक पेन ड्राईव्ह दिला आहे. या पेन ड्राईव्ह मध्ये 70च्या दशकात शरद पवार यांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली केस फॉर जस्टीस, या फिल्ममध्ये साधारण 18 व्या शतकातीलही पुरावे आहेत, कि तिथे मराठी भाषा वापरली जात आहे. सर्व गोष्टी फिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. एक पुस्तकही दिलं आहे, असे ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com