Latur POCSO Case Sarkarnama
मराठवाडा

Latur Minor Girl Abuse Case : कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अत्याचार; भोंदूबाबाला सार्वजनिक मंडळातील पूजेत असतानाच अटक

Latur Police arrested a man accused of assaulting a 17-year-old girl under the pretext of removing a horoscope dosh : लातूरमध्ये 17 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; चार महिन्यांची गर्भवती असल्याचे रुग्णालयातील तपासणीत समोर, POCSOसह विविध कलमांखाली गुन्हा

Pradeep Pendhare

Latur Crime News : कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी रामेश्वर हनुमंतराव रामदासी (वय 45) याला अटक केली आहे.

संबंधित व्यक्तीविरोधात पोक्सो कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील एका 17 वर्षीय मुलीचे पालक काही महिन्यांपूर्वी तिची कुंडली दाखवण्यासाठी रामेश्वर रामदासीकडे गेले होते. त्यावेळी कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे हा उपाय असल्याचे त्याने सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मुलीच्या घरी जाऊन पूजा मांडली.

या पूजेच्या दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape Case) केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांनी प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने ती शासकीय रुग्णालयात गेली. वैद्यकीय तपासणीत ती सुमारे चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक चौकशी केली. पोलिस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनीही रुग्णालयात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. चौकशीत रामेश्वर रामदासीविरोधात तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

पूजा करत असतानाच पोलिसांनी घेतले ताब्यात

रामेश्वर रामदासी हा लातूर शहरातील सम्राट चौक परिसरातील एका सार्वजनिक मंडळात पूजा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विवेकानंद चौक पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याला चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितल्यानंतर त्याने गणेशपूजेसाठी 11 हजार रुपये मानधनाची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT