Former Shiv Sena contact chief Balwant Jadhav joins Ajit Pawar-led NCP in Pune ahead of Latur Municipal Corporation elections, signaling major political shift in the district. Sarkarnama
मराठवाडा

ShivSena : एकनाथ शिंदेंच्या भोवती बडव्यांचा गराडा? ते चांगला, पण वरिष्ठांवर गटबाजीचा आरोप करत बड्या नेत्याचा 'जय महाराष्ट्र'!

Balwant Jadhav Defection: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लातूरमध्ये राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे नेते बळवंत जाधव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

Jagdish Pansare

Latur Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लातूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगलीच मुसंडी मारली. भाजपचे नगराध्यक्ष जास्त निवडून आले असले तरी जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. त्यामुळे या पक्षात प्रवेश करण्याकडे इतर राजकीय पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढला आहे.

अशात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख अॅड. बळवंत जाधव यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा पक्षप्रवेश झाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह तर शिवसेनेत उदासीनतेचे वातावरण पहायल मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून ॲड. जाधव हे शिवसेनेत आहेत.

राज्यात शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत ॲड. जाधव राहिले. त्यांचे कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत आले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांचे खटके उडत होते. त्यात महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासोबतच शिवसेनेचे (Shivsena) शहरप्रमुख परवेझ पठाण, उपप्रमुख विजयकुमार कांबळे, महिला प्रमुख कल्पना बावगे, अनुसूचित जाती आघाडीचे संपर्क प्रमुख बालाप्रसाद सोमाणी, उपतालुका प्रमुख नितीन महाजन आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले आहेत, पण वरिष्ठ गटबाजी करतात. येथे अभिप्रेत असे काम होत नसल्याने आपण पक्षांतर करीत असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT