Police Constable suicide, Latur
Police Constable suicide, Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur : आर्थिक व्यवहारातून पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून केली आत्महत्या

सरकरनामा ब्युरो

लातूर : जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वताःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. (Latur) शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Police) या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. (Marathwada)

दरम्यान, आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तणावातून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोल आली असून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये एका शिवसेना नेत्याचे नाव देखील असल्याचे समजते. किल्लारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी साहेब सावंत ( वय ३८ ) यांनी मध्यरात्री स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

काही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार झाल्यानंतर ते पैसे परत करत नसल्यामुळे सांवत हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत होते. साहेब सावंत हे कासार शिर्शी येथे असताना त्यांनी काही प्लॉट विकत घेतले होते. यावेळी झालेल्या आर्थिक व्यवहारातून त्यांचे काही लोकांशी वाद सुरू होते.

कर्ज काढून दिलेले पैसे परत मिळत नसल्याने ते कमालीचे अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी मध्यरात्री ठाण्यातील रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणी किल्लारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे स्वतः किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला आहे.

या घटनेची माहिती सकाळच्या वेळी समजताच किल्लारी आणि परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येपूर्वी सावंत यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती, ती पोलीसांच्या हाती लागली असून त्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. साहेब सावंत यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT