Chukur News : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षे एैवजी पाच वर्षे करण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा लातूर जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना होणार असून चाकूर येथे पुन्हा कपिल माकणे हे नगराध्यक्ष राहतील.
राज्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणूक (Election) 2021-2022 मध्ये झाल्या होत्या. याचा अडीच वर्षाचा कालावधी 8 ऑगस्ट रोजी संपला होता. राज्य सरकारकडून पुढील अडीच वर्षासाठीच्या आरक्षण कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे मुदत संपलेल्या जागेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आला होता.
नव्याने निघणाऱ्या आरक्षणाकडे(Reservation) सर्वांचे लक्ष लागून होते अनेक नगरसेवक नगराध्यक्षपदाची स्वप्ने रंगवत होती, याची स्वप्न आजच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे धुळीस मिळाली आहेत. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे चाकूरच्या नगराध्यक्षपदी कपील माकणे, शिरूरअनंतपाळ नगराध्यक्ष मायावती धुमाळे, जळकोट नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, देवणीच्या नगराध्यक्ष किर्ती घोरपडे यांना पुढील अडीच वर्षासाठी पुन्हा संधी मिळणार आहे.
राज्यात नगराध्यक्षपदाचे आरक्षण काढल्यानंतर नव्याने होणाऱ्या निवडीमध्ये मोठा घोडेबाजार होऊन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.