Nana Bhangire News : नाना नॉट रिचेबल; अन् नीलमताई म्हणतात 'ऑल इज वेल' !

Pune Lok Sabha Constituency : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे मात्र अनुपस्थित होते..
Nana Bhangire- Nilam Gorhe
Nana Bhangire- Nilam GorheSarkarnama

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना पुण्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा गुरूवार सकाळपासून सुरू आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून सारं काही अलबेल असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाकडून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी हा मेळावा असणार आहे.याबाबतची माहिती देण्यासाठी गुरूवारी पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली.हा मेळावा हडपसर परिसरात होत असताना याच परिसरात राहणारे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे मात्र अनुपस्थित होते.त्यामुळे नाना भानगिरे हे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे का ? याबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या मेळाव्या संदर्भात नाना भानगिरे यांच्याशी आज संपर्क झाला. त्यांच्याशी सुमारे 25 मिनिटे बोलणं झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Bhangire- Nilam Gorhe
Aaba Bagul News : काँग्रेसच्या निराधार 'आबा बागुलांना आता 'खुर्ची'चा आधार !

उपस्थित पत्रकारांनी त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं असता गोऱ्हे म्हणाल्या, तुमच्याकडे कदाचित त्यांचा चुकीचा नंबर असेल अथवा टेक्निकल एरर असेल. मात्र मी त्यांच्याशी संपर्क साधला असता पहिल्याच प्रयत्नात माझा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. पक्ष वाढविण्याच्या संदर्भात आणि उद्याच्या मेळाव्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांची कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमात चुकीच्या बातम्या देण्यात आल्या असल्याचा खुलासा नीलम गोऱ्हे यांनी केला. भानगिरे माध्यमांशी देखील बोलतील असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर देखील नाना भानगिरे यांच्याशी संपर्क झालेला नाही. या सर्व प्रकारामुळे नाना भानगरे आता माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका मांडणार का? का ते थेट दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

काय आहे नाराजीचे कारण?

दोनच दिवसांपूर्वी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. मुख्यमंत्री येणार असल्याने यासाठी मोठी जय्यत तयारी नाना भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी मोहम्मदवाडी या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरे यांच्या घरी जाणं टाळलं. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी खेड शिवापूरला आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या घरी जात भोजन घेतले होते. यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Nana Bhangire- Nilam Gorhe
Pooja Ravetkar News : शिंदे अन् नानांचा वाद जेवणावरून; पूजा रावेतकरांची डोकेदुखी 'व्हायरल' फोटोवरून

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com