Shiv Sena leader Ambadas Danve amid controversy over alleged financial dealings benefiting BJP during Zilla Parishad elections. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : प्रकल्प लातूरच्या भूमीत अन् रोजगार बाहेरच्या लोकांना, हे चालणार नाही; 'तुम से ना हो पायेगा' आंदोलनातून ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा!

Political News : 'मराठवाड्याचा विकास तुम से ना हो पायेगा' या जन आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT : प्रकल्प लातूरच्या भूमीत अन् रोजगार बाहेरच्या लोकांना हे चालणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे, कैलास पाटील यांनी लातूर प्रशासनाला व सरकारला दिला. 'मराठवाड्याचा विकास तुम से ना हो पायेगा' या जन आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या या जनआंदोलनाच्या माध्यमातून लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला अंबादास दानवे, कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट देत पाहणी केली.

रेल्वे कोच फॅक्टरी सुरू झाली, मात्र स्थानिक युवकांना अपेक्षित रोजगार मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. उलट उच्च व वरिष्ठ पदांवर बाहेरील राज्यांतील व्यक्तींना संधी दिली जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. लातूरच्या भूमीत प्रकल्प उभा राहणार आणि रोजगार मात्र बाहेरच्या लोकांना मिळणार, हे कदापि चालणार नाही! या कारखान्यातील स्थानिक मराठी युवकांना प्राधान्याने रोजगार, प्रशिक्षण आणि मानाची पदे मिळाली पाहिजेत, अशी ठाम भूमिका या दोन्ही आमदारांनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेतली.

आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांचा प्रशासनावर परिणाम झाला असून स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी देण्यात आल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. तसेच रेल्वे कोच फॅक्टरीची संपूर्ण माहिती घेत उत्पादनाची सद्यस्थिती या दोन्ही आमदारांनी जाणून घेतली. कारखाना सुरू झाला असला तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन होत नसेल, तर या प्रकल्पाचा अपेक्षित रोजगारनिर्मिती आणि लातूरच्या औद्योगिक विकासाला फायदा कसा होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळे या कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवावी, प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात आणि मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, पप्पु कुलकर्णी, बालाजी जाधव, बजरंग जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT