Shivaji Kalge Sarkarnama
मराठवाडा

Shivajirao Kalge : खासदार होऊन दीड महिना होत नाही तोच शिवाजी काळगे अडचणीत; नेमकं काय झालं?

Latur Lok Sabha News : मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात 7 जुलै रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Sunil Balasaheb Dhumal

युवराज धोत्रे

Latur Political News : लोकसभेच्या लातूर मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे हे भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत निवडून आले. विजयाचा आनंद आणि सत्कार सुरू असतांनाच काळगे अडचणीत सापडले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी अॅड. योगेश उदगीरकर यांच्यामार्फत खासदार शिवाजी काळगे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काळगे Shivaji Kalge यांनी जात वैधता प्रमाणपत्र कुठल्या आधारे जोडले याला आता हायकोर्टात चॅलेंज करण्यात आल्याची माहिती स्वत: अॅड. उदगीरकर यांनी दिली आहे. 1986 मध्ये औरंगाबाद विभागाचे तत्कालीन आयुक्त यांनी डॉ. शिवाजी काळगे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले होते. त्यास काळगे यांनी आव्हान देत राज्य शासनाकडे याचिका दाखल केली होती.

शासनाने त्यावेळी ही याचिका फेटाळून लावत जात प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावा अॅड. योगेश उदगीरकर यांनी केला आहे. त्यानंतर पुन्हा डॉ. काळगे यांनी दुसरे जात प्रमाणपत्र काढून तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्र काढून घेतले. यात जात पडताळणी प्रमाणपत्रावर लातूर लोकसभेची निवडणूक त्यांनी लढली आणि ते जिंकले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात 7 जुलै रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे. हे जात प्रमाणपत्र खरे आहे की खोटे? याची खातरजमा करावी, अश मागणी यातून करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व शासनाला या प्रमाणपत्र संदर्भात अहवाल न्यायालयाने मागितला आहे.

त्यानंतर 17 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र पडताळणी विरोधात दुसरी याचिका दाखल करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात याचा निकाल लागून काळगे यांची खासदारकी रद्द होईल, असा दावा अॅड. उदगीरकर यांनी केला.

लातूर Latur लोकसभेतून निवडून आलेले उमेदवार हे लवकरच घरी जातील आणि लातूरमध्ये पुन्हा निवडणूक होईल, असा दावा उदगीरकर यांनी केला. तसेच माझे वडील नरसिंग उदगीरकर यांच्यावर निवडणुकीत ते मॅनेज झाल्याचा होत असलेला आरोप खोटा असल्याचे योगेश उदगीरकरांनी स्पष्ट केले.

लातूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार मैदानात होते. त्यापैकी माझे वडील नरसिंग उदगीरकर यांनीच खासदार शिवाजी काळगे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात आवाज उठवल्या असल्याचा दावा अॅड. योगेश उदगीकर कर यांनी आपल्या फेसबुकवरील व्हिडिओमधून केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT