Video Ajit Pawar News : अजितदादांचा फोन मुख्यमंत्री शिंदेंनी उचलला नाही; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

Pune Jilha Niyojan Samiti Meeting : पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक पुण्यात शनिवारी पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले होते. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडाला आता वर्ष उलटून गेलं नाही.पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळूनही अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी सरस ठरली. आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांना टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार हे दोन दिग्गज नेते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आमने सामने आले होते. याच बैठकीतून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक पुण्यात शनिवारी (ता.20) पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले होते. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

यावेळी अजित पवारांनी खासदारांच्या काही प्रश्नांवरुन बैठकीतून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावला. पण यावेळी शिंदेंनी त्यांचा फोन घेतला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar Politics : भाजपला धक्का! मोठा नेता शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

शरद पवार यांनी गेल्यावर्षी डीपीसीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे ते आज देखील या बैठकीला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण या बैठकीला हे दोन्हीही नेते उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. डीपीसीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक आराखड्यावर चर्चा झाली.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे 5 मिनिटं आधीच सभागृहात दाखल झाले होते. काहीवेळातच अजित पवारही बैठकीसाठी आले, पण ते पवारांच्या शेजारच्या दोन खुर्च्या सोडून बसले. महत्त्वाची बाब म्हणजे बैठक संपेपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या यांच्या दिशेला बघणंही टाळलं. डीपीडीसी बैठकीची घडलेल्या या प्रसंगाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

Ajit Pawar, Eknath Shinde
Shrijaya Chavan : अशोक चव्हाणांसाठी मुलीचे राजकारणातील लाँचिंग सोपे नाही...

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता सुरुवात झाली होती.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला किती निधी देणार यावरही होण्याची चर्चा झाली. सत्ताधारी आमि विरोधक आमदारांना समान निधी वाटप करण्याची मागणी बैठकीत खासदार सुप्रिया सुळेंनी उचलून धरली.

Ajit Pawar, Eknath Shinde
Kapil Patil Vs Suresh Mhatre : खासदार म्हात्रेंची टीका कपिल पाटलांच्या जिव्हारी; म्हणाले,'मी काय कुणाच्या भरवशावर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com