Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Latur Water Train Controversy : 2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणण्यामागे राजकीय षडयंत्र? विलासरावांच्या बदनामीचा डाव; अमित देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!

Amit Deshmukh claims the 2016 Latur water train was a political move to tarnish Vilasrao Deshmukh image. Know the Jaldoot controversy : मिरजहून लातूरला पाणी आणण्याच्या ऐतिहासिक निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप; दशकभरानंतर जुन्या घटनेचा नवा राजकीय अर्थ.

Pradeep Pendhare

Maharashtra Political Controversy : 2016मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात लातूर शहराची तहान भागवण्यासाठी मिरज येथून रेल्वेने पाणी आणण्यात आले होते. मात्र, त्या ऐतिहासिक जलवाहतुकीमागे राजकीय षडयंत्र होते.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बदनाम करण्यासाठी रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा हा राजकीय डाव होता, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.

लातूर (Latur) शहरात 2016 मध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मिरज येथून 'जलदूत' या विशेष रेल्वेद्वारे लातूरमध्ये पाणी आणण्यात आले. या घटनेची आठवण करून देत अमित देशमुख यांनी त्यामागच्या राजकारणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. लातूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लातूरचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना बदनाम करण्यासाठी रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा राजकीय डाव रचण्यात आला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लातूरला पाणी आणता आले नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता, असा दावा आमदार अमित देशमुख यांनी केला.

लातूरसाठी पहिली 'जलदूत' गाडी 11 एप्रिल 2016 रोजी सांगली जिल्ह्यातील मिरज येथून निघून सुमारे 342 किमी अंतर पार करत पोहोचली. प्रत्येक वॅगची 50 हजार लिटर क्षमता असलेल्या सुरुवातीला 10 वॅगनपासून सुरू झालेल्या या गाडीत पुढे 50 वॅगन जोडण्यात आल्या. 100 हून अधिक फेऱ्यांतून 24 ते 25 कोटी लिटरहून अधिक पिण्याचे पाणी लातूरला पोहोचवण्यात आले होते.

रेल्वेने पाठवलेले सुरुवातीचे 4 कोटी रुपयांचे बिल तत्कालीन रेल्वे मंत्रालयाने माफ केले होते. पुढे सुमारे 9 कोटी रुपयांच्या बिलाबाबतही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयात तोडगा काढून महापालिकेवर भार न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमित देशमुख यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर लातूर जिल्ह्यात थंडीत राजकीय वातावरण या मुद्यावरून तापू लागले आहे. अमित देशमुख यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढू जाऊ लागले आहेत. त्यावेळी केंद्रात भाजपप्रणित एनडीए, तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीची सरकार होती. मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस होते. केंद्र व राज्यातील सरकारचे गणित जुळवून, अमित देशमुख यांच्या विधानाचे त्यातून राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT