Suresh Dhas Audio Clip : 'त्याचे हातपाय मोडतील, तुझा नंबर लागू नये!' सुरेश धस यांच्या आवाजाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; बीडमध्ये खळबळ

A purported audio clip resembling BJP MLA Suresh Dhas voice has gone viral. The clip allegedly features a conversation with a Manoj Jarange supporter, including threats of physical harm : मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया टीममधील तरुणाशी कथित संवाद; 'मनोज चौधरीचा एवढा पुळका कशासाठी?' असा सवाल, ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची अधिकृत पुष्टी नाही.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Viral Audio Clip : मराठवाड्याच्या राजकारणात सध्या कथित ऑडिओ क्लिपमुळे नव्या वादांना तोंड फुटले आहे. आता भाजप आमदार सुरेश धस यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये एका तरुणाला थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे ऐकायला मिळत आहे. हा संवाद मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित तरुणासोबत झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या क्लिपमधील आवाज आणि संवादाची सत्यता स्वतंत्रपणे पडताळली जाणे आवश्यक आहे.

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या (Audio Clip) सुरुवातीला समोरच्या तरुणाला 'तू पांढरीचा का?' असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यानंतर 'तुला त्या मनोज चौधरीचा एवढा पुळका कशासाठी? तो समाजासाठी काम करतो म्हणतो. मनोज चौधरीने समाजासाठी काय दिवे लावलेत?' असा सवाल केला जातो. तसेच, 'तू बाळासाहेब पाथरकर यांना फोन केला होता का? तुझा चेहरा दाखव, माझ्यासमोर कधी आला आहेस का?' असेही विचारल्याचे ऐकायला मिळते.

यावर संबंधित तरुण 'नाही अण्णा, मी कधी तुमच्यासमोर आलेलो नाही,' असे उत्तर देतो. त्यानंतर पुन्हा मनोज चौधरीचा एवढा पुळका कशासाठी, असा प्रश्न विचारला जातो. यावर तरुण आपली बाजू मांडताना, 'मी बोलता-बोलता म्हटलं की बाळासाहेब आपले मराठा समाजाचे काम करतात. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे काम मीही सोशल मीडियावर करतो आणि तोदेखील करतो,' असे सांगतो.

Suresh Dhas
Microfinance Loan Recovery : दुष्काळातही मायक्रो फायनान्सची पठाणी वसुली! हप्ते थकले म्हणून महिलेचे घरच केले सील

तरुणाच्या या उत्तरानंतर कथित ऑडिओ क्लिपमधील संवादाचा सूर अधिक आक्रमक झाल्याचे ऐकायला मिळते. 'तू जरांगे पाटलांचे सोशल मीडियाचे काम करतोस आणि आमच्या आईला घोडा लावतोस का?' असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर संबंधित तरुण 'तसं नाही अण्णा,' असे म्हणतो. मात्र, समोरून 'तू स्वतःला समजतोस काय? माझ्या विरोधातील माणसाचा तुला एवढा पुळका येतो?' अशा शब्दांत जाब विचारला जातो.

Suresh Dhas
Rahul Gandhi on PM Modi : ट्रम्प-पुतिन-जिनपिंग एकाच टेबलावर, मोदी कुठे? राहुल गांधींचा 'तडजोडीच्या पंतप्रधानां'वर घणाघात!

'जय गोपीनाथ, जय भगवानगड म्हणतोय, असे समाजाचे काम करतोय काय? जरांगे पाटलांचे काम करतोय काय?' असे प्रश्नही या कथित संभाषणात विचारल्याचे ऐकायला मिळते. तसेच, 'तू कोणाचा समर्थक आहेस, काय आहेस, हे मला माहिती आहे. आमच्या आईला घोडे लावणाऱ्यांना त्रास देऊ नका, असे तू म्हणतोस. मला तुला एका दिवशी बघायचंय,' असेही समोरून म्हटल्याचे ऐकायला मिळते. यावर तरुण वारंवार 'नाही अण्णा, तसं काही नाही. सॉरी,' असे म्हणताना ऐकू येतो.

त्याचे हातपाय मोडतील...

या कथित ऑडिओ क्लिपमधील सर्वाधिक चर्चेत असलेला भाग म्हणजे हातपाय तोडण्याची धमकी. 'तू बाळासाहेब पाथरकर यांना फोन कसा काय केला? ते सर्वांचीच बाजू घेतात. जरांगे यांची बाजू घेतात, बजरंग सोनवणे यांची बाजू घेतात, माझीही बाजू घेतात. त्यांना तू मनोज चौधरी समाजाचे काम करतो, असे सांगतोस. त्यांनी समाजासाठी काय काम केले? त्यांच्याकडे कोणत्या कामांची यादी आहे, ती मला पाठव. त्याचे हातपाय मोडतील आणि त्यानंतर तुझा नंबर लागू नये,' अशा आशयाचा संवाद या क्लिपमध्ये ऐकायला मिळतो. यावर संबंधित तरुण 'नाही, तसं काही नाही अण्णा. सॉरी... सॉरी!' असे म्हणत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पुन्हा बाळासाहेब पाथरकर यांना फोन का केला, असा सवाल केला जातो. यावर आपण त्यांना नेहमीच फोन करत असतो, असे तरुण सांगतो.

मनोज चौधरी चर्चेच्या केंद्रस्थानी

'तू जरांगे पाटलांचे सोशल मीडियाचे काम करतोस, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. पण मनोज चौधरीचा एवढा पुळका आणायला तुला कोणी सांगितला?' असा सवालही या संभाषणात करण्यात आल्याचे ऐकायला मिळते. 'मी नेहमी त्यांच्याशी असे बोलत असतो. तसं काही नाही अण्णा,' असे उत्तर देत संबंधित तरुण आपली बाजू मांडतो. यानंतर हा संवाद संपतो.

बीड पुन्हा चर्चेत

बीड जिल्ह्यातील राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर याआधीही अनेकदा चर्चा झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय संबंध, गुन्हेगारी आणि विविध आरोपांवरून राजकीय वातावरण तापले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आता सुरेश धस यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने बीडमधील राजकीय घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मात्र, या क्लिपची सत्यता, त्यातील आवाजाची ओळख आणि संभाषणाचा नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही.

सुरेश धस यांची प्रतिक्रिया काय?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येणारा आवाज भाजप आमदार सुरेश धस यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या क्लिपबाबत धस यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. ऑडिओ क्लिपमधील संवादाबाबत ते काय भूमिका मांडतात, तसेच या प्रकरणावर संबंधितांकडून काही प्रतिक्रिया येते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.