MP Shivaji Kalge Sarkarnama
मराठवाडा

MP Dr.Shivaji Kalge : डाॅक्टर काळगे लागले कामाला, लातूरच्या प्रश्नांचे ऑपरेशन सुरू..

Latur Congress MP Dr. Shivaji got busy : बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात कमबॅक झाले आहे. त्यामुळे काळगे यांना निवडून देणारे मतदार आणि विरोधक त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. संसद अधिवेशनात खासदरा म्हणून सहभागी झालेल्या काळेग यांनी दिल्लीत आपला राबता वाढवल्याचे चित्र आहे.

Jagdish Pansare

Latur Congress Politics News : पेशाने डाॅक्टर असलेले लोकसभेच्या लातूर मतदारसंघाचे खासदार शिवाजी काळगे कामाला लागले आहेत. लातूरकरांचे प्रश्न संसदेत मांडून त्यांचे ऑपरेशन सुरू केल्याबद्दल लातूरकर समाधान व्यक्त करत आहेत. लातूर लोकसभेची निवडणूक यावेळी विविध मुद्यांनी गाजली.

यात भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा मतदारसंघाशी नसलेला संपर्क प्रामुख्याने काँग्रेस-महाविकास आघाडीकडून पुढे करण्यात आला होता. (Latur) मतदारसंघाकडे पाच वर्ष न फिरकणाऱ्या सुधाकर शृंगारे यांना आता घरी बसवा, असे आवाहन आमदार व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी जाहीर सभांमधून केले होते.

भाजपचा सलग तिसरा विजय रोखण्यासाठी काँग्रेसने नवखा आणि उच्चशिक्षित उमेदवार दिला आणि सहानुभूती मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा लातूरात झाली, पण ही सभा भाजपचा पराभव टाळू शकली नाही. महायुतीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांच्या कामगिरीकडे लातूरकरांचे बारकाईने लक्ष असणार आहे.

बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात कमबॅक झाले आहे. त्यामुळे काळगे यांना निवडून देणारे मतदार आणि विरोधक त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. (Congress) केंद्रातील एनडीए सरकारच्या पहिल्याच संसद अधिवेशनात खासदरा म्हणून सहभागी झालेल्या काळेग यांनी दिल्लीत आपला राबता वाढवल्याचे चित्र आहे.

मतदारसंघातील रेल्वे, रस्ते, आरोग्याचे प्रश्न घेऊन ते संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांची भेट घेत त्यांनी लातूर जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वे संदर्भातील प्रश्न मांडले. मराठवाड्यातील वाढते रेल्वे प्रवासी आणि दळणवळणाच्या दृष्टीने मुंबई- पुणे- लातूर- हैदराबाद अशी वंदे भारत रेल्वे सुरू करावी.

तसेच लातूर शहरातील जुना रेल्वे स्थानक परिसरातील जमीन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोपविण्यात यावी, लातूर-औसा- गुलबर्गा ही नवीन रेल्वे लाईन करण्यात यावी, लातूररोड- अहमदपूर-लोहा-नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग तयार करावा. लातूर रोड -जळकोट - बोधण हा रेल्वे मार्ग तातडीने पूर्ण करावा.

त्याचबरोबर सर्व लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला लातूररोड- बार्शी ते कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग दुहेरी करावा, आदी मागण्या काळगे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केल्या. लातूर येथील रेल्वे कोच कारखान्याचे काम रखडले आहे. रोजगार निर्मितीचा उद्देश हा बाजूलाच राहिला असून या कोच फॅक्टरीतुन लवकरात लवकर रेल्वे डबे निघावेत, याकडेही काळगे यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. या मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.

डाॅक्टर असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करण्यात आलेली तरतूद कमी असल्याचे सांगत काळगे यांनी सभागृहात आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. आपण निवडून दिलेला खासदार लोकसभेत बोलतो आहे, प्रश्न मांडतो आहे, याबद्दल मतदार काळगे यांच्या सोशल मिडियावरील पोस्टवर व्यक्त होत आहेत.

प्रश्न आहेत, राहणार आहेत व सुटतीलही, पण त्यांना वाचा फोडणारा, प्रश्न मांडणारा योग्य व्यक्ती मिळाला ह्याचे खुप मोठे समाधान मतदारांना मिळाले आहे. चाळीस पन्नास वर्षांतील एकमेव खासदार, ज्याला मतदारसंघात प्रश्न असतात व मांडायला हवे हे कळाले, अशा शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत. काळगे यांची ही सुरुवात हे अजून त्यांना मोठा टप्पा गाठायचा आहे. पण त्यांची सुरूवात चांगली झाली हे ही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT