Marathwada Politics : महाराष्ट्राच्या सत्तेची वाट मराठवाड्यातून; असं असणार विधानसभेचं गणित...

Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता 46 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला 34 विधानसभा जागांवर तर महायुतीला केवळ 12 जागांवर आघाडी मिळाल्या आहेत.
Marathwada
MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : सध्या प्रत्येक पक्ष मराठवाड्यावर फोकस करताना दिसतोय. या मागचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मारलेली मुसंडी आणि महायुतीला बसलेला फटका!

आगामी विधानसभेला मराठवाड्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी युती-आघाडीत जणू स्पर्धाच लागलीये. मराठवाड्यात नेमक्या काय सुरू आहेत राजकीय हालचाली?

लोकसभेला युतीच्या वाट्याला मतांचा 'दुष्काळ'

महायुतीचे घटक पक्ष तर आतापासूनच मराठवाड्यात तळ ठोकून आहेत. अर्थात, त्याला कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यानं महायुतीला पाजलेलं पराभवाचं पाणी! 08 लोकसभा मतदारसंघांपैकी एकमेव छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता मराठवाड्यात महायुतीनं मतांचा दुष्काळ पाहिला.

शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांनी ती जागा जिंकून देत महायुतीची लाज राखली. भाजपचे तर चारहीच्या चारी उमेदवार तोंडावर पडले. मग ते रावसाहेब दानवे असो किंवा Pankaja Munde पंकजा मुंडे... राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून रासपला सुटलेली जागा देखील महायुतीनं गमावली.

लोकसभेला कुणाच्या वाट्याला किती जागा?

मराठवाडा : लोकसभेच्या एकूण जागा (08)

महायुती : (जिंकलेली जागा - 01- छत्रपती संभाजीनगर)

शिवसेना शिंदे गट - 01

राष्ट्रवादी अजित पवार गट - 00

भाजप - 00

महाविकास आघाडी : (जिंकलेल्या जागा - 07 - जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड)

शिवसेना ठाकरे गट - 03

काँग्रेस - 03

राष्ट्रवादी शरद पवार गट - 01

Marathwada
Supriya Sule : पुणे पूरस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा संताप, सरकारला धरले जबाबदार; नेमके काय म्हणाल्या?

मराठवाड्यात 2019 च्या विधानसभेचं चित्र कसं होतं?

हे झालं लोकसभेचं... पण विधानसभेचं काय? भाजपकडं सध्या तरी सर्वांत जास्त म्हणजे 16 जागा आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील भोकरची जागा भाजपकडं गेल्यानं त्यात आणखी एका जागेची भर पडली.

शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडं 09 तर ठाकरे गटाकडं 03 अशी 12 जागांची विभागणी झाली. काँग्रेसकडं 08 जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं अजित पवार गटाकडं 06 तर शरद पवार गटाकडं 02 अशी 08 जागांची विभागणी झाली.

मविआची मुसंडी, युतीची पिछाडी

आताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता 46 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला 34 विधानसभा जागांवर तर महायुतीला केवळ 12 जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसून आलं.

2019 च्या विधानसभेचं चित्र डोळ्यांसमोर उभं केल्यास महाविकास आघाडीला 2019 मध्ये मिळालेल्या 16 जागां व्यतिरिक्त आणखी 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याचं दिसून येतं.

तिकडं महायुतीचा आलेख पाहिल्यास 2019 मध्ये मिळालेल्या 28 जागांपैकी फक्त 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजेच 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची लोकसभेला पिछेहाट झाल्याचं चित्र आहे.

जो तो उठतोय, मराठवाड्यात जाऊन बसतोय!

लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला बसू नये, यासाठी महायुतीनं मराठवाड्यावर फोकस केला. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मराठवाड्यातील संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी देखील भाजप विस्तारकांच्या बैठका संभाजीनगरात घ्यायला सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेत रूपांतरित करण्यासाठी आपली पहिली सभा संभाजीनगरमध्येच घेतली.

शरद पवारांनी Sharad Pawar देखील संभाजीनगरमध्ये रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आणि सभा, बैठका घेतल्या. जयंत पाटलांनी मॅरेथॉन बैठकांचं सत्र याच मराठवाड्यात पार पाडलं. राजू शेट्टींची शेतकरी आघाडी सध्या मराठवाड्यातच जोर लावताना दिसतेय.

प्रकाश आंबेडकरांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता संभाजीनगरमध्येच होणार आहे. विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केलेल्या मनसेच्या राज ठाकरेंनी देखील आपला मराठवाडा दौरा सुरू केला. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला ज्यांच्या नावाचा फॅक्टर चालला ते मनोज जरांगे मराठवाड्यातूनच जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता आहे.

एकूणच काय तर प्रत्येक पक्षाच्या रडारवर सध्या मराठवाडा आहे. कारण लोकसभेच्या निकालानंतर सर्वांना कळून चुकलंय... ज्याचा मराठवाडा त्याचा महाराष्ट्र..!

Marathwada
Bachchu Kadu Vs Ravi Rana : चंद्रकांतदादांसमोरच बच्चू कडू - रवी राणा भिडले! काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com