Ambadas Danve News : Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : शिंदे गटाला दोन जागा तरी मिळतात का ते बघूया; अंबादास दानवेंनी दाबली दुखरी नस!

Ambadas Danve On Eknath Shinde : लोकसभेचे जागावाटपांवरून सुंदोपसुंदी..

सरकारनामा ब्यूरो

Marathwada News : आगामी लोकसभा निवडणुकींसाठीचे राजकीय पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना याबाबतीत जागावाटपाच्या दाव्यावर हालचाली सुरू केल्या आहेत.

महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे तर शिंदे गटातही (Shinde Group) काही नेत्यांमध्ये याबाबत नाराजीचा सूर आहे. शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना समर्थक नेते खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनीही यावरून खंत व्यक्त केली होती.

गजानन कीर्तीकर यांनी भाजपकडून एनडीएतील घटक पक्षाला सापत्नपणाची म्हणजेच सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याची मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. यामुळे आगामी लोकसभेत शिंदेंच्या शिवसनेला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते व खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेसाठी २२ जागांचा दावा केला आहे.

शिंदे गट भाजपच्या जागा वाटपाच्या वादात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता उडी घेतली आहे. दानवे यांनी यबाबत भाष्य करत शिंदेच्या शिवसेनेला डिवचले आहे. "आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदेंना दोन जागा तरी मिळतात का ते बघू," असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. यातील किमान १९ जिंकलेल्या जागांवर ठाकरे गट ठाम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आघाडीतही जागावाटपावरून संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT