University Chancellor : पुणे-मुंबई विद्यापीठाला लाभणार नवे कुलगुरू : निवडीआधीच प्राध्यापक संघटनांचा विरोध..

University Chancellor Select Pune-Mumbai University : कुणाकुणाची होणार निवड..
Pune University
Pune UniversitySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कुलगुरू बदलांची चर्चा आहे. मुंबई (Mumbai University) आणि पुणे विद्यापीठाला (Pune University) आता नवे कुलगुरू मिळणार आहेत. कुलगुरू निवड समितीने मागील आठवड्यातच मुंबई विद्यापीठ आणि त्यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या मुलाखती घेतल्या होत्या. यानंतर काही संभाव्य नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. मागील काही काळापासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरूपद रिक्त होते. प्राध्यापक संघटनेकडून चर्चेत असलेल्या नावांवर निवडीआधीच विरोध दर्शवला गेला. यामुळे कुलगुरूपद मिळतं याकडे लक्ष लागलं आहे.

Pune University
Transfers Of Police Officer: राज्य सरकारचा बदल्यांतील घोळ कायम, तीन एसीपीं'च्या बदल्या दोन दिवसांत रद्द, नऊंच्या बदलीत बदल

मुंबई विद्यापीठ कुलगुरू नियु्क्तीच्या सुरू झालेल्या प्रक्रियेमध्ये 80 जणांनी सहभाग नोंदवला होता. यातील २० जणांच्या मुलाखती पार पडल्या. निवड समितीने या मुलाखती मागील आठवड्यात घेतल्या. यानंतर एकूण पाच नावे, राज्यपलांकडे पाठवण्यात आली आहेत. या पाच नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यापैकी एकाची राज्यपाल म्हणून निवड करतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय कुलगुरू निवड समितीन यांनी तब्बल 27 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता या २७ पैकी ५ नावे अंतिमत: निश्चित करून ती राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत.

मुंबई विद्यापीठ कुलगुरूसाठी संभाव्य नावं -

प्रा. रवींद्र कुलकर्णी - मुंबई विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू म्हणून यांनी काम केला आहे

सुरेश गोसावी - भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

तेज प्रताप सिंग - बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक

ज्योती जाधव - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट

अर्चना शर्मा - भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

Pune University
Raju Shetti : राजू शेट्टींची मोठी घोषणा : लोकसभा स्वतंत्रपणे लढणार ; 'या' मतदारसंघातून दंड थोपटणार..

पुणे विद्यापीठाची संभाव्य नावं -

डॉ. पराग काळकर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता

प्रा. अविनाश कुंभार - विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग

डॉ.संजय ढोले - भौतिकशास्त्र विभाग

प्रा. सुरेश गोसावी - पर्यावरण शास्त्र विभाग

डॉ. विजय फुलारी - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग

Pune University
Thackeray vs Shinde : सोळा आमदार अपात्रता कारवाईस वेग ; नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव ; पक्षाची घटना..

मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपले होते. त्यामुळे तेव्हापासून हे पद रिक्त होते. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठ कुलगुरूचा पदाचा अतिरिक्त कार्यभार (प्रभारी) दिला गेला होता.

महाराष्ट्रचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून 30 जानेवारी 2023 या दिवशी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) माजी अध्यक्ष डी.पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली आहे. या यूजीसीच्या समितीत आयआयटी वाराणस संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांचादेखील समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com