Laxman Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Beed businessman suicide : भाजप पदाधिकाऱ्यानं सावकारी छळानं परिसीमा गाठली; पैशांसाठी पत्नीला आणून सोड, व्यापाऱ्याला धमकी

Beed BJP Leader Laxman Jadhav Booked in Ram Fatale Suicide Linked to Loan Sharking : बीडमधील सावकार प्रकरणी भाजप पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव याच्यासह सात जणांविरोधात पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Pradeep Pendhare

Beed police FIR BJP leader : बीडमधील सावकारीतून कापड व्यापाऱ्यानं आपलं जीवन संपल्याची घटनेनं संतापाची लाट उसळली आहे. हा सावकारीचा करणारा भाजप पदाधिकारी निघाला आहे. राम दिलीप फटाले (वय 42), असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

'वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड', अशी धमकी देखील या व्यापाऱ्याला सावकारी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याने दिल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न समोर आला आहे.

बीड (BEED) शहरातील कापड व्यापारी राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी व्याजानं पैसे घेतले होते. अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे करण्यात आली होती. मात्र पैसे देऊन देखील राम फटाले यांचा सावकारीचा जाच कमी होत नव्हता.

'तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड', असे सावकारी करणारा भाजपचा (BJP) पदाधिकारी धमकावून मानसिक छळ केला जात होता. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी सहा पानांची चिठ्ठी लिहित आत्महत्या केली.

राम फटाले यांनी घरासमोर गळफास घेतला. बीड शहरातील काळा हनुमान ठाणा भागात ही घटना घडली. राम फटाले यांनी चिठ्ठीत सावकारी करणाऱ्या सात जणांची नावे लिहिली आहेत. यात भाजपचा भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव याचा समावेश आहे. राम फटाले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राम फटालेंची चिठ्ठी

राम फटाले यांनी सहा पानांची चिठ्ठी लिहिली आहे. यात मी चांगला पती-पिता होऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. तुम्ही सर्वजण चांगले राहा. मुलांनो अभ्यास करा असे म्हणत पत्नीला सर्व जबाबदारी स्वीकारण्याविषयी म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना उद्देशून पत्र लिहित सावकारांची नावे देखील नमूद केले आहेत.

मुख्य संशयित भाजपचा पदाधिकारी

पेठ बीड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक मोदीराज यांनी दाखल गुन्ह्यात सात जणांपैकी तिघांना अटक केली आहे. यातील मुख्य संशयित भाजप पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव याच्यासह तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे, अशी माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT