Ashok Chavan, Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : …अन् खासदारकीपासून ‘वंचित’ राहिलेल्या अशोक चव्हाणांचा जीव भांड्यात पडला!

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा मागील निवडणुकीत वंचितमुळे झाला होता पराभव...

Laxmikant Mule

Nanded News : गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा ‘वंचित’चा फटका बसण्याचा धोका होता. परंतु, अशोक चव्हाण यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्याला यश आले आणि आता वंचित बहुजन आघाडी राज्यातील महाविकास आघाडीचा भाग बनणार आहे. (LokSabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MahaVikas Aaghadi) तर फायदा होईलच, पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची गेल्यावेळी हुकलेली खासदारकीची संधीही पुन्हा मिळू शकेल, असे बोलले जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आता वंचितचा अधिकृत आघाडीमध्ये समावेश झाला असून याबाबतचे पत्र वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर‌ (Prakash Ambedkar) यांना देण्यात आले आहे.

भाजपविरोधी (BJP) मतांची विभागणी टळावी, यासाठी वंचितला सोबत घेण्यासाठी अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मुंबईत झालेल्या बैठकीत वंचितला सोबत घेण्याचा ठराव केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयाचे गणित वंचितमुळे बिघडले होते. यात नांदेडचाही समावेश होता, एमआयएम-वंचित आघाडीच्या उमेदवाराने लाखांवर मते घेतल्याने अशोक चव्हाण यांचा सलग दुसरा विजय हुकला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आघाडीने राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. तेव्हाच्या औरंगाबादचा अपवाद वगळता एमआयएम-वंचित आघाडीला राज्यात कुठेही यश मिळाले नाही. परंतु त्यांनी घेतलल्या लक्षवेधी मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना फटका बसला होता. त्यानंतर सात महिन्यांत वंचितने एमआयएमसोबतची साथ सोडत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले.

आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. वंचितसोबत आल्यामुळे ही जागा आता आघाडी हमखास जिंकणार असे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांना तब्बल एक लाख साठ हजार मते मिळाली होती. याचा फटका अशोक चव्हाणांना बसला होता. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे 41 हजार मतांनी विजयी झाले होते.

नांदेडची जागा पुन्हा जिंकायची असेल तर वंचितला सोबत घेणे आवश्यक आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये सुरू होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समविचारी पक्षांना सोबत घेऊन महायुतीपुढे एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. वंचित महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाल्याने अशोक चव्हाणांसाठी शुभसंकेत मानले जात आहेत. गेल्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दिल्लीत जाण्याची संधी वंचितमुळे हुकली होती.

(Edited By - Rajanand More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT