MNS: मनसे जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल; सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याची तक्रार

Buldhana News: शिवीगाळ करून धक्काबुक्की
MNS
MNSSarkarnama
Published on: 
Updated on: 

Buldhana : व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याची बाब समोर येत आहे.

बुलढाणा येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्षांनी सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिखली येथील सोयाबीन, कापूस व्यापारी गोविंद अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

MNS
OBC Reservation: टिकली पुसून आडवं कुंकू लावा, मगच आमच्यासोबत या! मेळाव्यापूर्वी OBC आक्रमक

मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार गोविंद अग्रवाल यांनी केली आहे. आरोपींनी दोन लाखांची खंडणी मागितल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com