Bajrang Sonwane sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane News : बीडमधील बहिण-भावाचे गुंडाराज संपविणार, बजरंग सोनवणे कडाडले

Dattatrya Deshmukh

Beed News, 12 May : जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात लाट निर्माण झालेली आहे. शब्द देतो, उतणार नाही, मातणार नाही, सालगडी म्हणून काम करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिली. निवडणुकीपुरते ओबीसी म्हणता आणि विजयानंतर फक्त तुम्हीच कसे, असा सवालही त्यांनी केला.

सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांच्या प्रचाराची सांगता शरद पवारांच्या सभेने छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर झाली. सभेत बजरंग सोनवणे यांनी विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. "तुम्ही बहिण-भाऊ दहा वर्षांपासून आलटून पलटून पालकमंत्री आणि खासदार होता, मग जिल्हा मागासलेपणाचे पाप कोणाचे? असा सवाल करत हे पाप आपण धुवून काढू. बहिण भावाचे जिल्ह्यातील गुंडाराज संपविणार," असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.

"धनगर, ओबीसी आरक्षणासाठी झटणार तसेच, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांची मागणी लाऊन धरणार आहे. खासदारांनी स्वतःचा खासदार निधी खर्च केला नाही. मात्र, संसदेत हसण्यात त्यांनी वेळ घालविला. माझ्या मुलीच्या पराभवाबद्दल बोलणाऱ्यांचे पिताश्री देखील पराभूत झाले होते. तिकडे अजित पवार यांच्या मुलाचा देखील पराभव झाला होता, हे त्यांनी विसरू नये," असा टोलाही बजरंग सोनवणेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संदीप क्षीरसागर म्हणाले, "ज्यांनी आपल्याला सोडले त्यांना परत घेवू नका, आपली सत्ता येणार असून बजरंग सोनवणे यांना निवडूण आणा."

सय्यद सलिम यांनी म्हटलं, "पालकमंत्री म्हणतात जातीवाद करू नका, पण त्यांच्याच समोर मोदींनी मुस्लिमांबाबत बोलून जातीयवाद केला."

"85 वर्षाचा तरूण सेनानी महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असून भाजपचा तंबू हवेत फेकला जाईल. परळीची मक्तेदारी मोडीत काढू," असं निर्धार सुरेश नवले यांनी व्यक्त केला.

उत्तम जाणकर म्हणाले, "भाजपवाले विकास केल्याचे सांगतात. तर मग मोदींना माळशिरसच्या बाजारात फिरण्याची का वेळ आलीय ज्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांच्या हातात आपली काठी न देता, त्यांच्या पाठीत काठी घाला."

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT