Udayanraje Bhosale : उदयनराजे भावूक, 'मी राजीनामा देतो पंकजाला निवडून आणतो'

Beed Loksabha : उदयनराजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आत्ता माझ्या भाषणाने पंगत असाल तर पंगा पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका. मतदान करा. त्यावेळी उदयनराजेंनी हात जोडून वाकून नमस्कार देखील केला
Pankaja Munde Udayanraje Bhosale
Pankaja Munde Udayanraje Bhosale sarkarnama

Loksabha Election : बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटल्याचे चित्र आहे. आज (शनिवारी) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत आपल्या नेहमीच्या स्टाईलने उदयनराजेंनी टोलेबाजी केली. मात्र, पंकजा मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन करताना उदयनराजे भावूक झाले.

Pankaja Munde Udayanraje Bhosale
Lok Sabha Election: शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर..., शरद पवारांचं ऐन निवडणुकीत सूचक वक्तव्य

'पंकजा Pankaja Munde काय वेगळी नाही. माझे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोटं धरायला. गोपिनाथ मुंडेंनी माझं बोट धरलं. तुम्हाला कोणी काही म्हणणे पण तुम्हाला महाराजांची शपथ, माझ्या गळाची शपथ पंकजाला निवडून देणार ना', असे म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. 'नाहीतर मी राजीनामा देतो. तीला निवडून आणतो.' असं म्हणत बहिण पंकजा हिला निवडून आणण्याचे आवाहन उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी केले.

उदयराजेंनी जोडले होत

उदयनराजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आत्ता माझ्या भाषणाने पंगत असाल तर पंगा पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका. मतदान करा. त्यावेळी उदयनराजेंनी हात जोडून वाकून नमस्कार देखील केला. ते काहीसे भावूक झाल्याचे देखील दिसले. उपस्थित नागरिकांमधून त्यांच्याकडे कॉलरस्टाईलची मागणी केली. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी काॅलर उडवली त्यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या अन् शिट्ट्या वाजवत जल्लोष केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांची बजरंग सोनेवणेंवर टीका

अजित पवारांनी महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली. हा म्हणत होता की छाती फाडली तर तुम्हीच. अरे बाबा छाती फाडली तर जिवंत राहशील का? पंकजाताईच्या विरोधात उभा आहे. पूर्वी तो सारखा माझ्याकडे यायचा. काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते. तशी मस्ती त्याला आली आहे. त्याला स्वतःच्या पोरीला ग्रामपंचायतीला निवडून आणता आले नाही, असे अजित पवार म्हणाले.

Pankaja Munde Udayanraje Bhosale
Pankaja Munde News : प्रचार संपण्याआधी पंकजांची भावनिक साद; 4 जूनला याच हातांनी मुंडेसाहेबांवर अंत्यसंस्कार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com