Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha: बीडमध्ये घर बांधण्यासाठी वर्गणी जमा करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Pankaja Munde News: "आष्टी, बीड आणि गेवराई मतदारसंघात आले, की मी बीडला राहील आणि आंबेजोगाई माजलगाव केज मतदारसंघासाठी मी परळीत राहील. परंतु, ही फक्त कार्यकर्त्यांची सोय व्हावी यासाठी आपण बीडमध्ये घर बांधणार आहे."

सरकारनामा ब्यूरो

Beed Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये घर बांधण्यासाठी कार्यकर्त्यांना वर्गणी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय कार्यकर्त्यांची सोय व्हावी, यासाठी आपण बीडमध्ये घर बांधणार असल्याचंही मुंडे म्हणाल्या आहेत.

बीडची (Beed) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. शिवाय त्या आपल्या जाहीर सभांमधून कार्यकर्त्यांना मतदान करण्याचं आवाहनही करत आहेत. अशातच आज एका प्रचार सभेत बोलताना मुंडे यांनी कार्यकर्त्यांना घर बांधण्यासाठी वर्गणी जमा करण्याचं आवाहन केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आता मी बीडमध्येही घर बांधणार आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी जर वर्गणी जमा करून मला जागा घेऊन दिली, तर मी घर बांधते ते तुमच्याच नावावर राहू द्या, मी फक्त मरेपर्यंत त्या घरात राहते. आष्टी, बीड आणि गेवराई मतदारसंघात आले, की मी बीडला राहील आणि आंबेजोगाई माजलगाव केज मतदारसंघासाठी मी परळीत राहील.

शिवाय ही फक्त कार्यकर्त्यांची सोय व्हावी, यासाठी आपण बीडमध्ये घर बांधणार असल्याचंही मुंडे म्हणाल्या. शिवाय मला अख्खा देश जरी लिहून दिला, तरी माझ्यासाठी तुमचं प्रेमच महत्त्वाचं आहे, अशी भावनिक साद घालत पंकजा मुंडे यांनी आपण कार्यकर्त्यांसाठी तत्पर राहणार असल्याचं आश्वासनच या वेळी दिल्याचं पाहायला मिळालं.

मुंडेंचा जानकरांना घर घेण्याचा सल्ला

तर पंकजा मुंडेंनी मागील काही दिवसांपूर्वी परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनादेखील त्यांच्या मतदारसंघात घर घेण्याचा सल्ला दिला होता. जानकर यांच्या प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या "जानकरसाहेब तुम्ही या लोकांसाठी इथे एक घर घ्या, तुम्ही एकटेच आहात, त्यामुळे छोटं घर घ्या. तुमच्या घरासमोर वंचित पीडितांची गर्दी झाली पाहिजे. त्यांचं आयुष्य घडविण्यासाठी तुम्ही काम करा."

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT