Lok Sabha Election: निवडणुकीच्या तोंडावर जानकरांवर शिवसेनेचे पदाधिकारी नाराज; नेमकं काय घडलं?

Mahadev Jankar: पाथरी येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि बाबजानी दुरानी यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. अशातच महादेव जानकर यांनी दुरानी गटाला पसंती दर्शविल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महादेव जानकर यांच्या विरोधात गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे.
Mahadev Jankar, Eknath Shinde
Mahadev Jankar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Lok Sabha Election 2024: मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू असून, रमजाननिमित्त शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरी (Pathari) येथे काल इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

या इफ्तार पार्टीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे जिल्हाभरातील आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी आणि हजारो मुस्लिम बांधवांना बोलावण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे याच इफ्तार पार्टीला महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) हे प्रमुख आमंत्रित असतानाही ते या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले नाहीत.

इफ्तार पार्टीला हजारो लोक उपस्थित असताना महादेव जानकर (Mahadev Jankar) इकडे फिरकलेदेखील नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे पाथरीमध्येच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बाबाजानी दूराणी (Babajani Durrani) यांच्या इफ्तार पार्टीला जानकर उपस्थित होते. त्यामुळे शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mahadev Jankar, Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेची बालेकिल्ल्यातच दमछाक, मराठवाड्यात शिंदे गटाला फक्त...

पाथरी येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि बाबजानी दुरानी यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. अशातच महादेव जानकर यांनी दुरानी गटाला पसंती दर्शविल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महादेव जानकर यांच्या विरोधात गुप्त बैठक घेतल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाची नाराजी महादेव जानकर यांना निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच परवडणारी नाहीये.

Mahadev Jankar, Eknath Shinde
Raju Patil News : "गद्दारांना मदत नाही," राजू पाटलांचा राग कोणावर?

परभणी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातून महादेव जानकर यांनी उमेवारी अर्ज भरला आहे. जानकर यांनी अर्ज भरताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं. अर्ज भरल्यानंतर महायुतीची जाहीर सभा झाली होती. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित होते, तर जानकर यांनी तुम्ही मला परभणीत मदत करा मी महायुतीला राज्यभरात मदत करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. अशातच आता याच मतदारसंघातील शिंदे गटाचे पदाधिकारी जानकरांवर नाराज झाले असून, आता जानकर त्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com