Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : निवडणुकीत इंटरेस्ट नाही, पण...; लोकसभेसाठी जरांगेंचे मराठा समाजाला दोन पर्याय

Maratha Reservation : गावागावांत बैठका घ्या आणि 30 मार्चपर्यंत लोकसभेचा उमेदवार निश्चित करा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : सरकारने मराठा समाजाला ओबीसी नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली. सरकारने मात्र 10 टक्के स्वतंत्र्य आरक्षण देत समाजाची फसवणूक केली, असाही आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मी खासदार मोहीम राबवत गावागावांतून उमेदवार देण्याचा निर्णय समाजाच्यावतीने घेतला होता. यावर जरांगे पाटलांनी समाजाला दोन मोठे पर्याय दिले आहे. Manoj Jarange Patil News

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आत द्यावे, तरच सरकारने दिलेले आरक्षण स्वीकारू. तसेच त्यांनी मी निवडणुकीच्या भानगडीत पडणार नाही, असेही स्पष्ट केले. गावात जाऊन मराठा समाजसोबत बैठक घ्या, उमेदवार कोण द्यायचा हे निश्चित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

लोकसभा निवडणुकीत सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून राजकीय नेत्यांनी आपली जशी जिरवली तशी त्यांची जिरवा. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे बना, असे आवाहन करत जरांगेंनी समाजाला दोन पर्याय दिले.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) गावागावांतून अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. त्यामुळे आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन सर्व जाती धर्माचा जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा आणि त्याला अपक्ष निवडणूक लढवायला लावा. किंवा सगेसोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉण्ड करून पाठिंबा देईल, त्याला पाठिंबा द्या. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे दोन पर्यायही जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी केली होती. त्याला बगल देत सरकारने एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देत फसवणूक केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावर सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बणा. त्यासाठी 30 मार्चपर्यंत लोकसभेचे उमेदवार निश्चित करा, असे जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केले आहे. आता मराठा समाजाला कोण पाठिंबा देणार की समाज अपक्ष उमेदवार उभे करणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT