Nashik Lok Sabha 2024: भाजप अन् शिंदे गटात वाद चिघळणार! नाशिकसाठी कुरघोडीचे राजकारण सुरू

Nashik loksabha election 2024: नाशिक मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha 2024) भाजपकडे (BJP)केदा आहेर, 'मविप्र' संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पक्षाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील आदी इच्छुक आहेत.
Nashik Lok Sabha 2024
Nashik Lok Sabha 2024 Sarkarnama
Published on
Updated on

JP Vs Shinde Group: महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप एकोपा दिसत नाही. त्यामूळे नाशिक मतदारसंघ कोणाचा यावरील वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजपचे (BJP) पदाधिकारी उद्या मतदारसंघ मिळावा म्हणून थेट मुंबईला धडकणार आहेत.

महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट (Ajit Pawar) या प्रत्येकाने नाशिक मतदारसंघावर आपला अधिकार सांगितला आहे. त्यात आता मनसेचे राज ठाकरे यांची देखील भर पडली आहे. मनसेलाही नाशिक मतदार संघ हवा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाचा यावरून महायुतीमध्ये परस्पर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात भाजपचे नाशिक लोकसभा मतदारसंघप्रमुख केदा आहेर यांनी वरिष्ठ नेत्यांची काल चर्चा केली. महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत घटक पक्षाचे नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू होती. काल यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर ती चर्चा झालेली आहे. त्यामुळे ते एक-दोन दिवसात राज्यातील नेते परस्परांच्या करून निर्णय घेतील. त्यामध्ये नाशिक मतदारसंघ भाजपलाच असावा यावर सगळ्यांचे एकमत आहे.

Nashik Lok Sabha 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजप लोकसभेच्या ३० जागा लढवणार, हा युतीधर्म की ‘बनवाबनवी’?

आहेर म्हणाले, "भाजपकडे अत्यंत प्रभावी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी गेली दोन वर्ष या मतदारसंघात मोठे काम उभे केले आहे. भाजपने वर्षभरामध्ये बूथप्रमुखांपासून तर वरिष्ठ स्तरापर्यंत मोठी निवडणूक यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे. तसे झाल्यास आमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे. त्यामुळे आम्ही उद्या आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. नाशिकचे मतदारसंघ भाजपलाच मेळावा असा आमचा आग्रह आहे. त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला वाटतो.

नाशिक मतदारसंघासाठी भाजपकडे केदा आहेर, 'मविप्र' संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पक्षाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचं विविध इच्छुक आहेत नाशिकचे विद्यमान खासदार अकार्यक्षम असून त्यांनी मतदारसंघाचा अपेक्षित विकास केलेले नाही.

त्यामुळे या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फक्त भाजपच योग्य ठरू शकतो. असा या इच्छुकांचा दावा आहे. यातील काही इच्छुक सातत्याने सहकारी पक्षाचे खासदार व उमेदवारीचे दावेदार नंतर गोडसे यांच्यावर टीका करीत असतात. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेवरून मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com