Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : '...म्हणून माझ्यावर शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी' ; पंकजा मुंडेंचा निर्धार

Chetan Zadpe

Beed News : बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे मैदनात आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांची ताकद सोबत आली आहे. यावर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

"समन्वय करण्यासाठी एक चेहरा लागतो, जो सगळ्यांना एका माळेत बांधील. तर कदाचित त्यामुळेच माझ्यावर शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी असेल, मला वाटतंय त्यामध्ये मला बऱ्यापैकी यश येतं असून आले आहे," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी महायुतीसह सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यावर भाष्य केले आहे. त्या बीडमध्ये साम टीव्ही या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, "कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. कार्यकर्त्यांना इथून पुढची दुसऱ्या टप्प्यातील दिशा काय द्यायची ? यासाठी बैठक असून यावर चर्चा होणार आहे. ही अंतर्गत बैठक असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्याची ही बैठक आहे. यात आपला रणनीती कशी असावी याबाबत चर्चा झाली." (Latest Marathi News)

"विशेष म्हणजे समन्वय करण्यासाठी एक चेहरा लागतो, जो सगळ्यांना एका माळेत बांधील. कदाचित त्यामुळेच माझ्यावर हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी असेल. मला वाटतंय त्यामध्ये मला बऱ्यापैकी यश आले आहे. गावखेड्यामधून प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय, प्रेम आहे, माझी ओटी देखील भरतायत, अशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT