Pankaja Munde News : पंकजा मुंडेंना खासदार करण्यासाठी एक मंत्री, एक खासदार, पाच आमदार मैदानात; मतदार कोणाच्या मागे ?

Beed Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे एकीकडे कामाला लागलेल्या असतानाच त्यांच्यासाठी त्यांच्या भाजप तसेच नव्याने महायुतीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी देखील प्रचार सुरू केला आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : दोनवेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना खासदार करण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, रासप, कवाडे गट या पक्षांतील दिग्गज नेत्यांची फळी मैदानात उतरली आहे. एका मंत्र्यांसह एक खासदार, पाच आमदार आणि इतरही नेते कामाला लागले आहेत. आता मतदार कोणाच्या मागे हे मात्र मतदान आणि निकाल लागल्यास कळणार आहे.(Beed Loksabha Election 2024)

भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पहिल्याच यादीत पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव आले. परंतु, सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या आणि एकदा मतांचा विक्रम करणाऱ्या डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची उमेदवारी नेमकी का टाळली, याचे कोडे कायम आहे.

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी पंकजा मुंडे यांनी देखील जिल्ह्यात जोरदार एन्ट्री केली. सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील महायुतीतील स्वत:च्या भाजपसह घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्ष नेत्यांच्या गृहभेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी बूथ प्रमुख, बुथ वॉरिअर्स यांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे.

Pankaja Munde News
Ratnagiri Sindhudurg Loksabha Update: CM शिंदेंनी किरण सामंतांना तातडीने मुंबईला बोलावलं; मोठा निर्णय होणार?

पंकजा मुंडे एकीकडे कामाला लागलेल्या असतानाच त्यांच्यासाठी त्यांच्या भाजप तसेच नव्याने महायुतीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी देखील प्रचार सुरू केला आहे. पंकजा मुंडे यांना खासदार करण्यासाठी त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहेतच. शिवाय बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विधानसभेतील भाजपचे (Beed) आमदार लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा आणि लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुरेश धस देखील कामाला लागलेले आहेत. भाजप सोबतच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे देखील मैदानात उतरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पाच आमदारांसोबतच मागच्या वेळेस विधानसभा लढविलेले आणि आपल्या मतदारसंघात ताकद असलेले राष्ट्रवादीचे व भाजपचे इतर नेते देखील पंकजा मुंडे साठी मैदानात आहेत. यामध्ये गेवराईत अमरसिंह पंडित व त्यांचे बंधू विजयसिंह पंडित तसेच माजलगावमध्ये भाजपचे रमेश आडसकर, आष्टीत भाजपचे माजी आमदार भिमराव धोंडे, बीडमध्येही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक तसेच कुंडलिक खांडे यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, मोहन जगताप, बाबुराव पोटभरे, रिपाइंचे पप्पू कागदे यांचे देखील चित्र पक्षाच्या प्रमुख बॅनरवर आहे. तर, भाजपचे राजेंद्र मस्के यांच्यासह त्यांचे सहकारी देखील या निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. आता या सर्व नेत्यांचा एकत्रित मेळावा गुरुवारी बीड शहरात होणार आहे.

Pankaja Munde News
Satara Loksabha : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांच्यासह रासप जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब मतकर, कपिल गाडेकर तसेच कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी यासाठी मेळावा घेतला आहे. आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना खासदार करण्यासाठी आमदारांची संख्या अर्धा डझन आणि नेत्यांची संख्या त्याहून दुप्पट अशी मोठी फौज सध्या प्रचार करत आहे. आता बीड जिल्ह्यातील जनता कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde News
Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांच्या सभेत शेतकऱ्याला धक्काबुक्की; जाब विचारणाऱ्याला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com