Uddhav Thackeray, Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : संभाजीनगरबाबत ठाकरेंचं मौन, खैरेंना गॅसवर ठेवून परतले...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा दौरा आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणारी सभा रद्द झाली. शाह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ संभाजीनगरातून फोडणार असल्यामुळे ही जागा पहिल्यादांज भाजप लढवणार हे स्पष्ट झाले. (Lok Sabha Election 2024)

तिकडे भाजपशी (BJP) स्वंतत्रपणे दोन हात करायला सज्ज झालेल्या शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाच्या जनसंवाद मेळाव्यातून लोकसभा उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र आता ना शहांची सभा होणार आहे, ना ठाकरेंनी लोकसभा उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे महायुती आणि ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा दुसऱ्यांदा रद्द झाल्याने त्यासाठी केलेल्या तयारीवर पाणी फिरल्याने भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी कमालीचे नाराज आहेत. तर उद्धव ठाकरे लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांच्या नावाची घोषणा किंवा तसे संकेत देतील, या आशेवर असेल्या सैनिकांचीही निराशा झाली. उमेदवारीबाबत मौन बाळगल्यामुळे चंद्रकांत खैरे यांना गॅसवर ठेवत ठाकरे मुंबईला परतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्यामुळे कदाचित महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने सध्या सबुरीने घेण्याचे ठरवलेले दिसते. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे. ठाकरे गटाला गेल्या निवडणुकीत थोडक्यात हुकलेला विजय पुन्हा खेचून आणायचा आहे.

तर भाजपला स्वतंत्रपणे लढून मराठवाड्याच्या राजधानीत पहिल्यांदा कमळ फुलवायचे आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. तर ठाकरे गटाला चव्हाणांचा भाजपमधील प्रवेश संभाजीनगरात किचिंतसा चिंतेचा विषय ठरणार आहे. परंतु, या पार्श्वभूमीवरच लोकसभा उमेदवार जाहीर करण्याची घाई उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद यात्रेत केली नसल्याचे बोलले जाते. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला होता.

या शर्यतीत दानवे मागे पडल्याने खैरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरल्याने खैरे यांच्या मनातली धगधग कायम राहणार आहे. राज्यसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कदाचित महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. महायुतीनेही अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. त्यामुळे दोन्हीकडचे इच्छूक सध्या गॅसवर आहेत.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT