Maratha Reservation : जरांगे-पाटलांच्या नाकातून रक्तस्त्राव; प्रकृती खालावली, अंतरवाली सराटीत मराठा समाजाची गर्दी

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Antarwali Sarathi : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 'सगेसोयरे' या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. (Maratha Reservation)

जरांगे-पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे-पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे समजताच मराठा समाजाने अंतरवाली सराटीत मोठी गर्दी केली आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषण स्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar : "मुर्मूंच्यापूर्वी भाजपकडून मला राष्ट्रपतीपदाची ऑफर होती, पण...", आंबेडकरांचा गौप्यस्फोट

बुधवारी दुपारी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे पाटील यांनी फक्त सलाईन लावून घेण्यास होकार दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे प्रशासन देखील अलर्ट झालं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि 'सगेसोयरे' या मागणी संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु केलेलं आहे. ते 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार त्यांच्या या मागणीबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar : जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com