Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : भुमरेंचा स्वॅगच वेगळा; स्वतः उमेदवार, पण मत मात्र दिले दुसऱ्यालाच...

Sandipan bhumare News : दोन आठवड्यांचा प्रचार, सभा, मेळावे, बैठका झाल्यानंतर आज संभाजीनगर मतदारसंघासाठी मतदान होत आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीने पैठण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरची जागा प्रतिष्ठेची केली आणि आग्रही असणाऱ्या भाजपकडून ती खेचून आणली. (Lok Sabha Election 2024)

दोन आठवड्यांचा प्रचार, सभा, मेळावे, बैठका झाल्यानंतर आज संभाजीनगर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. पण संदीपान भुमरे हे स्वतः उमेदवार असले तरी त्यांना स्वतःला मतदान करता आले नाही. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांनी पाचोड बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. जालना मतदारसंघातून महायुतीचे रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

महाविकास आघाडीच्या डाॅ. कल्याण काळे यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे. संभाजीनगर लोकसभा (LOk Sabha) मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी जिल्ह्यातील केंद्रीय व राज्याच्या मंत्र्यांनी जोरदार प्रयत्न केले. डाॅ. भागवत कराड स्वतः इथून लढवण्यास इच्छूक होते. याशिवाय गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नावाची चर्चाही होती. पण शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या चर्चा आणि नेत्यांच्या बैठकीतून तोडगा निघाला नाही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संभाजीनगरच्या जागेवरचा दावा कायम ठेवला आणि भाजप नेत्यांना त्यांच्या हट्टापुढे नमते घ्यावे लागले. आता मुख्यमंत्र्यांचा हा हट्ट त्यांना संभाजीनगरमधून विजय मिळवून देतो का? की महाविकास आघाडी बाजी मारणार हे चार जून रोजीच्या मतदानानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मतदान मात्र जालन्याचा खासदार निवडून आणण्यासाठी केले, याची महायुती, आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT