Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : ज्या पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवलं त्याच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला धुतलं

Congress Vs BJP : देशातील ही निवडणूक मोदी विरुद्ध कोणीच नाही अशी निवडणूक होत आहे. विरोधी पक्ष हा हतबल आहे. नेतृत्वाचा अभाव आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : महाविकास आघाडीने जागावाटपाचा तिढा सोडवून राज्यात लोकसभेसाठी Lok Sabha Election आघाडी घेतली आहे. यात ठाकरे गट 21 जागा घेऊन मोठा भाऊ झाला आहे, तर काँग्रेसला 17 तर शरद पवार गटास 10 जागा मिळाल्या आहेत. या जागावाटपावरून भाजपने देशात प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला लक्ष्य केले आहे, तर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे बडे नेते, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपकडून राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाणांनी काँग्रेसची अक्षरशः पिसे काढली आहेत. Ashok Chavan Attack on Nana Patole after MVA Lok Sabha Seat sharing.

देशातील ही निवडणूक मोदी Narendra Modi विरुद्ध कोणीच नाही अशी निवडणूक होत आहे. विरोधी पक्ष हा हतबल आहे. नेतृत्वाचा अभाव आहे. राज्यातील जागावाटपाचा विषय पहिला तर काँग्रेस पक्षाला केवळ 17 जागा देण्यात आल्या. एवढी केविलवाणी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. पारंपरिक सांगली, भिवांडी या जागा इतर पक्षाला सोडाव्या लागल्या आहेत. याचा अर्थ असा की काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेतृत्व कमकुवत आहे असा होतो, असा घणाघात अशोक चव्हाणांनी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर Nana Patole केला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे Ambadas Danve यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. महराष्ट्रातील भाजप नेते कूचकामी आहेत. त्यामुळेच त्यांना केंद्रातील नेते प्रचारासाठी आणावे लागत आहेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला होता. त्यालाही खासदार अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण Ashok Chavan म्हणाले, दानवे यांच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्याराेप होत असतात. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निकालातून आकडेच त्यांना सांगतील की, जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सभा होतात तेव्हा त्यांनाही इंडिया आघाडीतील केंद्रातील नेत्यांची गरज का भासते, असा पलटवार चव्हाणांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT