Baramati Lok Sabha Constituency : सुनेत्रा पवारांना मतदान का करावं? अजितदादांनी सांगितलं 'सुपर लाॅजिक'

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून बारामती तालुक्यातील गावागावांत जाऊन थेट लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. या वेळी एकमेकांची उणीदुणी काढत विकासकामांवर दावा सांगितला जात आहे.
Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलं आहे. बारामतीतील नणंद-भवजयच्या लढ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. वीस वर्षे बारामती ज्यांच्या हातात दिली त्यांनी दुष्काळी भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शरद पवारांनी केला. त्यानंतर अजित पवारांनीही त्यास प्रत्युत्तर देत तीस वर्षांचा आढावा घेत सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. Ajit Pawar appeal Baramatikar for Sunetra Pawar.

गुढीपाडव्यानिमित्त अजित पवार बारामतीत Baramati होते. कुटुंबीयासोबत सण साजरा केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी बारामतीतील गावागावांत प्रचारा सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी मतांसाठी तुम्हाला भावनिक केले जात आहे, मात्र भावनिक न होता कामांकडे पाहून निर्णय घेण्याचे आवाहन केले. तसेच बारामतीकर सुरुवातीपासून पवार कुटुंबासोबत आहेत. आताही पवार अडनावालाच निवडून द्या, असे अजित पवारांनी आवाहन केले.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, बारामतीकरांपुढे आता मोठा बाका प्रश्न उभा आहे. पहिल्यापासून आपण पवारांना साथ दिली आता काय करायचं. काही नाही, तुम्ही फक्त पवार आडनाव असेत तेच बटण दाबा, म्हणजे पवारांमागे उभे राहण्याची परंपरा खंडित होणार नाही. तुम्ही १९९१ लेकाला म्हणजे मला खासदार केले. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. नंतर लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना तीन वेळा साथ दिली. आता सुनेला निवडून द्या. त्यामुळे वडील खूष, कन्या खूष, लेक खूष, सूनही खूष आणि बारामतीकरही खूष!, असे म्हणत अजितदादांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पवार आडनावाला निवडून दिले तर कुणीही नाराज होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
BJP Vs Congress : काँग्रेस ठाकरे, पवारांसोबत भरकटली; सांगली, भिवंडीवरुन भाजपचा निशाणा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीकरांमध्ये द्विधा अवस्था झाली आहे. लोकसभेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule आमनेसामने आल्या आहेत. दोन्ही गटांकडून मतदारसंघातील गावागावांत जाऊन प्रचार केला जात आहे. एक दुसऱ्यांच्या नाराज शिलेदारांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे तर विधानसभेत अजित पवार असाही मतप्रवाह बारामतीत आहे. यावरून अजित पवारांनी माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या, पहिल्यापेक्षाही जास्त विकास करू, असे आवाहन वारंवार केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Sangli Lok Sabha Constituency : मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com