Prashant Bamb  Sarakranama
मराठवाडा

MLA Prashant Bamb : निवडणूक भुमरेंची तयारी बंब यांच्या विधानसभेची...

Bjp Politics : मराठवाड्यातील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचार करता करता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही आढावा घेतला.

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांनी सहा महिन्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

मराठवाड्यातील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचार करता करता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही आढावा घेतला. (MLA Prashant Bamb News)

यात सर्वात आघाडीवर होते ते भाजपचे गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब (Prashanat Bmb). मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या बंब यांनी लोकसभेसाठी महायुतीच्या भुमरेंना मताधिक्य मिळवून देण्याचा दावा केला आहे. विधानसभेला जी यंत्रणा बंब यांच्याकडून स्वतःसाठी राबवली जाते, तीच त्यांनी यावेळी भुमरे यांच्यासाठी राबवत युती धर्म पाळल्याचे बोलले जाते. अर्थात हे चार जून रोजीच्या निकालनंतरच स्पष्ट होईल.

दोन दिवसांपूर्वी आमदार बंब यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारीसाठी कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सोहळा दौलताबाद येथे आयोजित केला होता. याच सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली गेली, पण ती 2024 च्या नाही, तर चक्क पाच वर्षांनी होणाऱ्या 2029 मधील विधानसभेची. हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. पण स्वतः बंब यांनीच हा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2024 च्या विधानसभा निवडणुकीची आपली तयारी पूर्ण झाली आहे, त्याचे आता आपल्याला टेन्शन नाही. आता आपली तयारी 2029 साठीची आहे, अस बंब सांगतात. त्यांचा हा काॅन्फीडन्स विरोधकांना नक्कीच धडकी भरवणारा आहे. अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या कमळ चिन्हावरून निवडून आलेल्या बंब यांनी 2019 मध्ये गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात हॅट्रीक साधली होती. यावेळी ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संभाजीनगर मतदारसंघातून प्रशांत बंब यांचे नाव काहीकाळ चर्चेत आले होते. परंतु, बंब यांना लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त रस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रशांत बंब मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणणारे आमदार असल्याचे बोलले जाते.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT