Amit Shaha News, Amit Shah in Nashik, Nashik Latest Marathi News Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शहा फोडणार संभाजीनगरातून

Political News : 15 फेब्रुवारीला शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शहा यांची होणार सभा

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन 45 चे उदिष्ट घेऊन भाजप व महायुतीतील घटक पक्ष मैदानात उतरणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमधून या मिशनचा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीला शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शहा यांची सभा होणार आहे.

भाजप राज्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संभाजीनगरातून सुरू करणार असल्याने ही जागा भाजपच लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अमित शहा (Amit shah) यांच्या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी पुन्हा एकदा आपण लोकसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगितले. तसेच उमेदवारीचा निर्णय आमची संसदीय समिती घेईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

शिवसेनेसोबत २५ वर्षाहून अधिक काळ युती असल्यामुळे भाजपला संभाजीनगरमधून लढता आले नाही. आता युती आणि शिवसेना तुटल्यामुळे भाजपने पुर्ण ताकदीनिशी संभाजीनगरची जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने वरवर या जागेवर दावा सांगितला असला तरी त्यांना भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठीच काम करावे लागणार हे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे शिवसंवाद साधण्यासाठी सोमवारी येणार

विशेष म्हणजे उद्या, 12 रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसंवाद साधण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा जिल्हा दौरा आहे. यापुर्वी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि हिंगोली येथील मेळाव्याच्या निमित्ताने ते मराठवाड्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाकरे संभाजीनगरात येत असतांनाच भाजपने आज अमित शहा यांच्या 15 रोजी होणाऱ्या जाहीर सभेची घोषणा केली.

(Edited By- Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT