Nana Patole : कार्यकर्त्यांना लावले कामाला; काँग्रेसची विचारधारा पोहोचणार गावागावात

Village Visit : महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकरीचा मुद्दा रेटणार
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Politics : आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातुन काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले एका बैठकीदरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. काँग्रेसची विचारधारा गावागावात पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जिल्हाध्यक्षापासून तर गावागावातील कार्यकर्त्याला सुद्धा सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष वळविण्यासाठी मराठा-ओबीसी वाद पेटवून शिंदे-फडणवीस राजकीय पोळी शेकत आहेत. ही सत्यता जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना उघडे पाडा. काँग्रेस हा देशाला व राज्यासाठी पर्याय असल्याचा विचार जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Nana Patole
Bhandara-Gondia Politics : पटोले, डाॅ. फुके, पटेलांचा हल्ली मुक्काम जिल्ह्यातच !

भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन भंडारा येथील साई मंदिर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी मंत्री बंडू सावरबांधे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके, माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला अध्यक्ष जयश्री बोरकर उपस्थित होते.

आमदार नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाला बूथस्तरावर मजबूत करा, निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने लागावे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करावे, अश्या सूचना दिल्या आहे. नाना पटोले यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत. मृतप्राय झालेली काँग्रेस अचानक जिल्ह्याच्या राजकारणात वरचढ ठरत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीतील घटक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत झालेल्या फुटीनंतर काँग्रेस मोठा भाऊ झालाय. जिल्ह्यात ही महाविकास वेळी आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून नेतृत्व करत आहे. यासर्व घडामोडी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाची आकडेवारी सुद्धा कमालीची वाढली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस नक्कीच तगडा उमेदवार देईल, यात शंका नाही.

Edited By : Prasannaa Jakate

Nana Patole
Nana Patole News : नानांचं ठरलंय... समोरील तगडा उमेदवार पाहून लोकसभा लढणार, मात्र...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com