Uddhav Thackeray, Narendra modi Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray: PM मोदींच्या ऑफरचा उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार, म्हणाले; "कधी मला डोळा मार तर कधी..."

सरकारनामा ब्यूरो

Sambhajinagar Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच या सभेत बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि ठाकरेंना दिलेल्या ऑफरचा समाचार घेतला आहे.

"काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या", अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Uddhav Thackeray And Sharad Pawar) यांना दिली होती. मोदींच्या या वक्तव्याचा आधार घेत ठाकरेंनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते ठरवा, आजपर्यंत तुम्ही सर्वांना फोडलतं. शिवसेना फोडलीत. राष्ट्रवादी फोडली-तोडलीत तरीदेखील कधी मला डोळा मार तर कधी पवारांना डोळा मार, आज सकाळी पवारांना डोळा मारला. एकीकडे म्हणायचं नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि आता म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा" असं म्हणत ठाकरेंनी मोदींच्या ऑफरचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरमधील सभेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मोदीजी तुम्ही मला नकली संतान म्हणता, अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय? जसं तुम्ही अदानीला सगळं विकलय तसाच तुमचा आत्मा सैतानाला विकलेला दिसतोय. अशी थेर कशाला करता. आपली युती तुटली आहे, असा निरोप तुम्ही 2014 ला तुम्ही एकनाथ खडसेंमार्फत (Eknath Khadse) पाठवला होता.

त्यावेळी आमच्या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही पंतप्रधान झाला होता. तेव्हा तर मी युती तोडली नव्हती. तेव्हा तुम्ही युती तोडली. तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन दाखवेन, असा शब्द मी शिवसेना प्रमुखांना दिला आहे. तो शब्ददेखील तुम्ही तोडलात, असा आरोप ठाकरेंनी केला.

तर मोदींनी (Narendra Modi) एका मुलाखतीत आपण उद्धव ठाकरेंना ऑपरेशनचा सल्ला दिल्याचं म्हटलं होतं. यावरही ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, काल तुमचं माझ्यावर प्रेम उतू चाललं होतं. म्हणालात की ऑपरेशनचा सल्ला दिला. हे सगळचं कोटं आहे. तुम्ही माझी चौकशी करत होतात. तेव्हा मी हाता-पायांची हालचाल करु शकत नव्हतो. त्याच वेळेला तुम्ही चेलेचपाट्यांना घेऊन माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली, तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटलं असेल? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT