Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंमुळे शिंदेंसेनेचा गोविंदा हॉटेलबाहेर 20 मिनिटं वेटींगवर

Uddhav Thackeray And Govinda: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे शिंदेसेनेत दाखल झालेल्या गोविंदाला 20 मिनिटे हॉटेलबाहेर ताटकळत थांबावं लागलं आहे.
Govinda in Chhatrapati Sambhajinagar
Govinda in Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: सध्या देशासह राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरु आहे. राज्यात चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते सध्या मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

याच नेत्यांच्या धावपळीत बॉलीवूड अभिनेता गोविंदाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे शिंदेसेनेत दाखल झालेल्या गोविंदाला 20 मिनिटे हॉटेलबाहेर थांबावं लागलं आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अभिनेता गोविंदाला उद्धव ठाकरेरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे 20 मिनिटे हॉटेलच्या बाहेर ताटकाळत उभं रहावं लागलं. गोविंदाला (Govinda) त्याच्या रूमपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. गुरुवारी रात्रीपासून उद्धव ठाकरे हे हॉटेल संभाजीनगरमधील हॉटेल 'रामा' येथे मुक्कामी होते. त्याच हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेले अभिनेता गोविंदाही रात्रीपासून मुक्कामी आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे आणि गोविंदा या दोघांच्याही रूम एकाच मजल्यावर आहेत. दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी गोविंदा शहरात गेले होते. त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते हॉटेलमध्ये येत होते. ते हॉटेलच्या गेटवर पोहचले मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे हे जालन्याच्या सभेला जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडत होते. त्यामुळे तिथे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची धावपळ सुरु होती. याबाबतची माहिती गोविंदासोबत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी गोविंदाला तिथेच हॉटेल बाहेरच थांबवलं.

Govinda in Chhatrapati Sambhajinagar
Nitin Gadkari News : पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले...

मात्र काही कारणामुळे ठाकरे हॉटेलमधून बाहेर लवकर आलेच नाहीत. त्यामुळे जवळपास 20 मिनिटं वाट पाहून गोविंदा हॉटेलमध्ये येऊन रूममध्ये न जाता रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथेही त्याला 15 ते 20 मिनिटं थांबावं लागलं. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे हे रूममधून बाहेर पडताच गोविंदा आपल्या रूममध्ये गेला. त्यामुळे नव्याने शिंदेसेनेत आलेल्या गोविंदाची हॉटेलातच ठाकरेंमुळे अडचण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com