Buldhana News : लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोल्ड वॉर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची मागणी करणाऱ्या भाजपकडून आता बुलडाण्यावरही दावा केला जात आहे. त्यावरून हे दोन्ही पक्ष पुन्हा आमने सामने आले आहेत. पण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘आम्ही ही जागा भाजपला कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही. वेळ आली तर शिवसेनेची ही जागा राखण्यासाठी मी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेऊ शकतो,’ असा इशारा दिला आहे. (Shivsena's Sanjay Gaikwad's challenge to BJP On Buldhana Lok Sabha constituency)
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे बॅनर मतदारसंघात अनेक ठिकाणी लागले आहेत. त्यात आमदार गायकवाड यांच्या पाठीमागे संसदेचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय गायकवाड यांनी वेळप्रसंगी आपण लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे जाहीर केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बुलडाणा आणि आमच्या (शिवसेना शिंदे गट) १३ खासदारांच्या मतदारसंघाचा सर्व्हे भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेला आहे. त्यात आमच्या बुलडाण्याची ही जागा चार नंबरवर दाखवण्यात आली आहे. बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही, त्यामुळे ही जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
भाजपच्या मागणीवर आमदार गायकवाड म्हणाले की, शिवसेनेची बुलडाण्याची जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत भाजपला देणार नाही. आम्ही जिवाचे रान करून खासदार प्रतापराव जाधव यांनाच निवडून आणू. पण, भाजपवाल्याचं म्हणणं असेल की प्रतापराव जाधव हे निवडून येत नाहीत, तर मग लोकसभेसाठी आम्हीही तयार आहोत. आमचाही सर्व्हे करा म्हणजे समजेल की शिवसेनेचा सर्व्हे कुठे आहे आणि भाजपचा सर्व्हे कुठे आहे.
मी तर लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छूक नाही. पण, भाजपकडून जागा मागण्यात येत असेल आणि अटीतटीची वेळ आली, ते खासदार प्रतापराव जाधव यांना लढवत नसतील तर मग मी शिवसेनेची बुलडाण्याची जागा कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.