Ashok chavan, balaji Klaynkar, prtap Chikhlikar  Sekarnama
मराठवाडा

Political News : लोकसभेचे 'स्टेशन' दूरच; चव्हाण, कल्याणकर, चिखलीकरांमध्ये आधीच जुंपली

Laxmikant Mule

Nanded News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. नांदेड शहरासाठी १६७ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या मंजुरीवरून काँग्रेस व शिवसेनेच्या नेतेमंडळींत श्रेयावरून कलगी-तुरा रंगला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाने कामाचा धडाका लावला आहे. भूमिपूजन, लोकार्पण, नवीन कामांना मंजुरी देण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

नांदेड शहरासाठी १६७ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचा दावा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दावा केला आहे, तर दुसरीकडे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केल्याचे पुढे आले आहे.

जिल्ह्यातील रेल्वेच्या नवीन मार्गासाठी मंजुरी, राष्ट्रीय महामार्गाचे कामे या कामांच्याबाबतीत ही खासदार व आमदारांत श्रेयवादाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील रखडलेल्या विविध काम, प्रकल्पांना मिळणाऱ्या अपुऱ्या निधीची, स्थगित करण्यात आलेल्या कामांना कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नांदेड शहरासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत नांदेड-वाघाळा शहर मनपाने शासनाकडे सादर केलेल्या पाणीपुरवठा योजनेस काही दिवसांपूर्वी मान्यता मिळाल्यानंतर या महत्त्वाच्या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता, असा दावा त्यांच्या अलिकडच्या पत्राचा संदर्भ देत केला आहे. पण १६७ कोटींच्या प्रस्तावित योजनेविषयी सत्ताधारी पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji kalyankar) यांच्या सहा महिन्यांपूर्वीच्या पत्रानंतरच मार्गी लागल्याचा प्रतिदावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे..

‘अमृत-२’ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अलिकडे ३ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राची प्रत दाखवत अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळेच योजनेला मंजुरी मिळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केला आहे. त्याचवेळी आमदार कल्याणकर यांचे २७ जून २०२३ चे पत्र पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नव्या रेल्वे मार्गावरून दावे-प्रतिदावे

नांदेड-बिदर हा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने निधी मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. निधी व रेल्वे मार्गासाठी मंजुरीसाठी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले जात आहे. या रेल्वे मार्गासाठी भाजपचे आमदार राम पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण या रेल्वे मार्गासाठी मंजुरीच नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok chavan) दावा केला आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण केले जात आहे. हे कामे माझ्या पाठपुराव्यामुळे झाली आहेत. ती केंद्रातील मोदी सरकारने केली आहेत, असे ठामपणे खासदार चिखलीकर सांगत आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे २०१४ ते २०१९ या काळात खासदार होते. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी मी प्रयत्न केला आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

(Edited By - Rajanand More)

R...

SCROLL FOR NEXT