Bjp Mla Babanrao Lonikar Sarkarnama
मराठवाडा

लोणीकर म्हणतात, सक्तीच्या वसुलीला माझा विरोध, म्हणून खोटी कॅसेट व्हायरल केली..

रंगाबादेत माझा एकच बंगला आहे आणि त्याचे मीटर कुणीही काढून नेलेले नाही. त्यामुळे मी वीज अधिकाऱ्याला फोन करण्याचा आणि धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. (Babanrao Lonikar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : माजी मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या एका सहायक अभियंत्याला आर्वाच्य भाषेत धमकावल्याची आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. (Jalna) बंगल्याचे तीन लाख रुपये थकल्यामुळे लोणीकर यांच्या औरंगाबादेतील बंगल्याचे मीटर काढून नेल्याचा उल्लेख क्लीपमध्ये करण्यात आला होता. (Marathwada)

राज्यभरात या क्लीपची आणि लोणीकरांनी दिलेल्या धमकीची चर्चा सुरू झाल्यानंतर आता सक्तीच्या वीजबील वसुलीला माझा विरोध असल्यामुळे माझ्याविरोधात रचलेले हे षडयंत्र असल्याचा दावा लोणीकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आहे, मी कुठल्याच वीज कंपन्याच्या अधिकाऱ्याला फोन केला नाही, माझ्या बंगल्याचे मीटर काढून नेले नाही, असा खुलासाही लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केला आहे.

सव्वा मिनिटांचा व्हिडिओ लोणीकर यांनी जारी करत या संपुर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. लोणीकर म्हणाले, दिनदुबळ्या, शेतकरी, दलित, कष्टकरी, मजुरांची वीज हे सरकार सातत्याने कापते आहे. या विरोधात मी व भाजपचे सगळे आमदार सातत्याने सभागृहात आवाज उठवत असतो. पण महाविकास आघाडी सरकारला गरिबांचे दुःख समजत नाही.

मराठवाड्यातील अनेक विकासकामांच्या योजना या सरकारने बंद करून टाकल्या आहेत, त्यासंदर्भात देखील मी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला. पण राजकीय सुडबुद्धीतून कुणी तरी माझ्या विरोधात षडयंत्र रचत ही खोटी कॅसेट व्हायरल केली आहे. औरंगाबादेत माझे दोन बंगले आहेत आणि त्याचे मीटर काढून घेतल्याचा उल्लेख या क्लीपमध्ये आहे.

मुळात औरंगाबादेत माझा एकच बंगला आहे आणि त्याचे मीटर कुणीही काढून नेलेले नाही. त्यामुळे मी वीज अधिकाऱ्याला फोन करण्याचा आणि धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आणि मला बदनाम करण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचेही लोणीकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT