भाजप आमदाराचे वीज कनेक्शन तोडले.. करंट बसल्याप्रमाणे इंजिनिअरला फाडफाड बोलले

BJP MLA Babanrao Lonikar : कर्मचाऱ्याला थेट इडीचे (ED) छापे टाकण्याची धमकी.
Mla Babanrao Lonikar
Mla Babanrao LonikarSarkarnama
Published on
Updated on

जालना : भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी महाविकरणच्या (MSEB) कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडिवायर व्हायरल झाली आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात प्राप्तीकर आणि इडीचे छापे पडत आहेत. त्यातच लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला थेट इडीचे (ED) छापे टाकण्याची धमकी दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Mla Babanrao Lonikar
सत्ता हवी म्हणून फेव्हिकॉल सारखे चिकटले!

व्हायरल ऑडीओ क्लिपमध्ये लोकणीकर म्हणत आहेत, वीजबिल (Electricity Bill) भरले तरी मिटर का काढले, तिकडे झोपडपट्टीत जाऊन मिटर काढा. तसेच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, असे सांगत थेट निंलबित करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर प्राप्तीकर विभागाकरवी धाड टाकण्याचाही इशारा दिली.

बिल भरले तरी मिटर का काढून नेले, हिंमत असेल तर झोपडपट्टीमध्ये जाऊन मिटर काढा, असेही लोणीकर म्हणाले. तसेच बबनराव लोणीकरांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलताना काही अपशब्दही वापरले आहेत.

Mla Babanrao Lonikar
निलंबित IPS त्रिपाठींचा पाय खोलात; ठाकरे सरकारपाठोपाठ न्यायालयाचाही दणका

लोणीकर यांच्या औरंगाबाद येथील घराचे तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती होती. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराचे मिटर कट केले. हे समजताच लोणीकरांनी दादासाहेब काळे या कर्मचाऱ्याला धमकी दिली. सर्वसामान्य नागरिकांनी जर वीजबिल भरले नाही तर महावितरण त्यावर कडक कारवाई करते. कारवाई करताना नागरिकांकडून विरोध झाला तर शासकीय कामात अडथळा आल्याचे कारण देत महावितरण संबंधितावर गुन्हा नोंद करते. त्यामुळे आता लोणीकरांनी तर महावितरणच्या कर्मचाऱ्याला थेट धमकीच दिल्यानंतर महावितरण काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com