Ashok Chavan News, Maharashtra Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Surat News : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीच आहे, आता मुक्त भ्रमणाचा अधिकारही काढणार का ?

Congress : मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान करणारे राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : काॅंग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सुरत दौऱ्यावर आहेत. सुरत न्यायालयात उपस्थीत राहण्यासाठी ते जात असल्यामुळे देशभरातून काॅंग्रेसचे कार्यकर्ते त्यांना समर्थन देण्यासाठी सुरतला निघाले आहेत. परंतु पोलिसांकडून या नेते- पदाधिकाऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला जातोय.

महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना देखील गुजरात पोलिसांनी अडवल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संताप व्यक्त केला आहे. (Congress) चव्हाण यांनी ट्विट करत या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करतांनाच आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेतला की काय? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.

चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान करणारे राहुल गांधी सुरत येथे पोहोचले आहेत. आज ते सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुखू तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंचा देखील यात समावेश आहे. सुरत न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी सुरत पोलिसांनी अडवली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT