Imtiaz Jalil On Shirsat : एक ते आणि दुसरे हे `संजय`, शिंदेसाहेब शिरसाटांना लवकर मंत्री करा..

Shivsena : रोज टीव्हीवर येवून बडबड करत असतात. त्यांना मंत्री होण्याची इच्छा आहे.
Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat News
Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Aimim : शिंदेसाहेब तुमचे आमदार संजय शिरसाट रोज टीव्हीवर येवून तुमच्यासाठी भांडत असतात, काहीतरी बोलत असतात. एक शिवसेनेतले संजय राऊत (Sanjay Raut) आणि दुसरे संजय शिरसाट, लवकर त्यांना मंत्री करा. तुम्ही त्यांना मंत्री करत नसल्याने ते सगळा राग आमच्यावर काढत आहेत, असा खोचक टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

Mp Imtiaz Jalil-Sanjay Shirsat News
High Court News : उस्मानाबादचे `धाराशिव` करण्याच्या विरोधात दोन नविन याचिका

महाविकास आघाडीच्या कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली नसल्याचा मुद्दा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपस्थितीत केला होता. आम्ही साॅफ्ट काॅर्नर असल्यामुळे ठाकरे आमच्यावर टीका करतात, इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचे आम्ही काय ऐकायचे, असेही शिरसाट म्हणाले होते.

यावर इम्तियाज यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शिरसाटांना टोला लगावला. इम्तियाज म्हणाले, शिंदे सरकारने माझे नाही, पण किमान आपल्या पक्षाच्या आमदाराचे तरी ऐकावे. संजय शिरसाट हे शिंदेंच्या शिवसेनेतील दुसरे राऊत झाले आहेत. रोज टीव्हीवर येवून बडबड करत असतात. त्यांना मंत्री होण्याची इच्छा आहे, पण शिंदेसाहेब काही त्यांना मंत्री करत नाहीत.

माझी तर मागणी आहे आमच्या शहराला चौथा मंत्री लवकर द्या, संजय शिरसाट यांना मंत्री करा. मंत्रीपद मिळत नसल्याने ते त्याचा सगळा राग आमच्यावर काढत आहेत. उद्धव ठाकरे यांनी सभेत माझ्यावर टीका केली नाही, त्याबद्दल धन्यवाद. प

ण लोकांना पिण्यासाठी दररोज पाणी, स्वच्छ शहर, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा, रोजगार पाहिजे आहे. पण त्यावर ठाकरे काहीच बोलले नाही, हिंदुत्वावर बोलत त्यांनी विकास नाही तर हिंदुत्व हाच आपला अजेंडा असल्याचे दाखवून दिल्याची टीका देखील इम्तियाज यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com