Ratnakar Gutte, Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar : जानकरांनी महायुतीशी काडीमोड घेतला; आता रासपच्या एकमेव आमदारानं घेतला मोठा निर्णय

Rashtriya Samaj Paksha MLA splits from Mahayuti alliance: लोकसभा निवडणुकीवेळी आधी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीसोबत घेऊन तिकीट देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. पण देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार घडवित जानकरांना एका रात्रीत महायुतीत आणले होते.

Deepak Kulkarni

Parbhani News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेत महायुतीविरोधात दबावतंत्राचा वापर केला होता. जानकरांना महाविकास आघाडीसोबत घेऊन तिकीट देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या.

पण देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार घडवित महादेव जानकरांना (Mahadev Jankar) एका रात्रीत महायुतीत आणले होते. मात्र, परभणी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जानकरांनी महायुतीची साथ सोडत स्वबळाचा नारा दिला. पण आता त्यांच्या एकमेव आमदारानं मोठा निर्णय घेत थेट जानकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपचे नवनियुक्त आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महादेव जानकर यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. गुट्टेंच्या पाठिंब्यामुळे भाजप तसेच महायुतीचं संख्याबळ वाढलं आहे. आता गुट्टेंनी घेतलेल्या विरोधी भूमिकेवर रासपचे नेते महादेव जानकर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, महायुतीने आपल्याला पुरस्कृत केलंय, त्यामुळे जानकरांनी जरी वेगळी भूमिका घेतली असेल तर आपण तिच्याशी सहमत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गुट्टेंनी नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड विधानसभा निवडणुकीत 23 हजार 292 मतांनी विजय प्राप्त केला आहे.

गंगाखेडमधून सलग दुसर्‍यांदा 'आमदारकी'

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टेंनी विजय खेचून आणला. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम यांच्यावर 23 हजार 292 मतांनी मात केली. गुट्टेंना 1 लाख 41 हजार 544 तर विशाल कदमांना 1 लाख 15 हजार 252 मतं मिळाली.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट यांनी 43 हजार 26 मतं मिळवली. ही मतं गुट्टेंच्या विजयात निर्णायक ठरली. विधानसभेच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने गंगाखेडची जागा मित्रपक्ष रासपला सोडला होता. तिथे रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत गुट्टे यांचा 18 हजार 58 मतांनी विजय होता मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT