Walmik Karad son allegation Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad son allegation : महादेव मुंडे हत्या प्रकरण; वाल्मिक कराडच्या मुलाचा कट? ज्ञानेश्वरी मुंडेंचा जबाब, खाकी अ‍ॅक्शन घेणार?

Mahadev Munde Murder Case: Dnyaneshwari Munde Tells Beed Police Walmik Karad Is Her Son : महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती समोर येत आहे.

Pradeep Pendhare

Mahadev Munde murder case : बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात वेगवेगळे खुलासे होत असून, वाल्मिक कराड याचा मुलगा सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे, दिलेल्या जबाबात ही माहिती आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली.

यामुळे खळबळ उडाली असून, वाल्मिक कराड याच्या मुलाच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या जबाबावर पोलिस कोणती अ‍ॅक्शन घेतात, आता याकडे लक्ष लागलं आहे. याबाबत तपासी यंत्रणेकडून कोणताही खुलासा झालेला नाही.

बीड (Beed) जिल्ह्यातील परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, यामध्ये वेगवेगळे खुलासे होत आहेत. आतापर्यंत सहा लोकांची ब्रेन मॅपिंग झाली. तीन जणांची उद्या यात नार्को टेस्ट होणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या मुलाचे नाव, समोर येत आहे. तशी सूत्रांची माहिती आहे. व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा एसआयटीकडे जबाब नोंदवण्यात आला आहे. यात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिकच्या एका मुलाचे नाव घेतल्या असून तोच या कटाचा सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सहा लोकांच्या नार्को अन् ब्रेन मॅपिंग टेस्टची परवानगी मिळाली असून यामध्ये तिघांची पूर्वीच ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट झाली आहे. उर्वरित तिघांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग उद्या होणार असून या तिघांचेही नाव समोर आली आहेत. तेजस मोरे, सोमनाथ जाधव, महेश शिंदे या तिघांची उद्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये होणार आहे.

आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह येतील, त्यांना एसआयटी ताब्यात घेईल. आमचा एसआयटी आणि गृह खात्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. आयपीएस पंकज कुमावत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पुरवणी जबाब घेतल्याचेही आमदार धस यांनी सांगितले.

पोलिसांवरती अतिप्रेशर...

सुरुवातीला काही बाबींमध्ये पोलिसांवरती अतिप्रेशर होते. जेवढ्या खुल्या प्रमाणे जवाब व्हायला पाहिजे होते, ते सुरुवातीला झाले नव्हते. परंतु आता तपास सुरू केलेला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट या तपासणी पूर्ण झाल्यानंतर जे समोर येईल, त्यात कारवाई होईल, असे आमदार धस यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT