Tipu Sultan name controversy : 'टिपू' भाजपच्या मानगुटीवर! ठाकरेंनी मुंबई, तर शिंदे सेनेनं अकोल्यात उकरून काढला नामकरणाचा मुद्दा

Eknath Shinde Shiv Sena Demands Removal of Tipu Sultan Name in Akola : अकोला महापालिकेच्या स्थायी सभागृहाला टिपू सुलतान नाव बदलण्याची एकनाथ शिंदे शिवसेनेने मागणी केली.
Tipu Sultan name controversy
Tipu Sultan name controversySarkarnama
Published on
Updated on

Akola Municipal Corporation : राज्यात टिपू सुलतान या नावावरून राजकीय वाद पेटला आहे. मालेगाव महापालिकेतील टिपू सुलतान फोटोवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच, काँग्रेसने त्यात उडी घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सत्ताधारी भाजपने घेरलं.

परंतु हेच 'टिपू सुलतान' नाव सत्ताधारी भाजपच्या मागे घुमू लागल्यानं, अडचणीचं ठरू लागलं आहे. ठाकरे सेनेनं मुंबईतील रस्ते, बगिचे यांना टिपू नाव देणारा महाभाग भाजपमध्ये आहे, हे सांगून अडचण केली. यानंतर आता शिंदे सेनेनं भाजपची अकोला महापालिकेतील टिपू नामकरणाचा मुद्दा उकरून काढत मित्रपक्ष भाजपची कोंडी केली आहे.

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात टिपू सुलतान नाव हटविण्याची मागणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने केली. अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव आहे. अकोल्यात 12 जून 2012 मध्ये महापालिकेत ठराविक हे नाव देण्यात आल्याचे समोर आले आहे.

भाजप (BJP) बंडखोर असलेले, अन् आत्ताचे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी या नामकरणाच्या प्रस्तावाला सूचक होते, असा दावा एकनाथ शिंदे शिवसेनेने केला आहे.

Tipu Sultan name controversy
RSS criticism : ‘संघ हा दैत्यासारखा’! मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानानं राजकीय वाद

अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेने स्थायी समिती सभागृहाचे नाव बदलवण्याची मागणी केली. टिपू सुलतान नाव बदलून सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, असे शिंदे शिवसेने म्हटले आहे.

Tipu Sultan name controversy
Bachchu Kadu On Tukaram Mundhe : ‘वेग’ कुठे अन् ‘तोरा’ कुठे? तुकाराम मुंढेंच्या तोऱ्यावर बच्चू कडूंचा घणाघात

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या या मागणीनंतर आता अकोल्यात स्थायी समिती सभागृहाचे नाव बदलण्यासाठी प्रशासन पुढाकार घेतंय का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अकोल्यातला हा मुद्दा उकरून एकनाथ शिंदे शिवसेनेनं, शिवसेना ठाकरे सेनेच्या पाऊलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.

मुंबईमधील रस्ता, बगीचे यांना टिपू सुलतानचे नाव द्या, असे प्रस्ताव महापालिकेत मांडणारे महाभाग आज ‘भाजप’मध्ये आहेत व ते या निवडणुकीत भाजपतर्फे महापालिकेत पोहोचले, त्यांचे काय करणार? असा सवाल 'सामना'तून केला होता.

हाच मुद्दा एकनाथ शिंदे शिवसेनेने अकोल्यात उकरून काढत, मित्रपक्ष भाजपला डिवचलं आहे. भाजप याचा आता 'सामना' कसा करते याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com