Pankaja Munde and Namdev Shastri  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : महंत नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले, पंकजा मुंडेंनी अहंकार कमी करावा..

Pankaja Munde and Dhananjay Munde : धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नामदेव शास्त्री एकाच मंचावर

सरकारनामा ब्यूरो

Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात भागवान गडाच्या नारळी सप्ताहाला हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले बहीण-भाऊ सप्ताहाच्या सोहळ्याला एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलीच राजकीय शेरेबाजी रंगली. यावेळी भागवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे देखील तेथे उपस्थित होते. यावेळी गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्येही चांगलीच शेरेबाजी रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना एक सल्लाही दिला.

महंत नामदेव शास्त्री म्हणाले, ''पंकजा मुंडेंसोबत माझे वैर नाही. त्यांचे काही लोक खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा. स्वाभीमान ठेवावा आणि अंहाकर सोडावा'', असा सल्ला नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

यानंतर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींनी दिलेल्या सल्ल्याला उत्तर दिलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, ''माझ्या बोलण्याला आणि मी लाखोंच्या जनसमुदायासमोर बोलताना केलेल्या मोठ्या आवाजाला अहंकार समजू नये. स्त्री बोलली तर तो अहंकार. मात्र, एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ समजतात. मग ही तुमची मानसिकता आहे का?'', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आज या नारळी सप्ताहाच्या सोहळ्यानिमित्त हा दुरावा मिटल्याचेही दिसून आले.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT