Beed Politics : पंकजा-धनंजय मुंडेंच्या नात्यातील कडवटपणा संपला; एकत्र येण्याचे दिले संकेत

Pankaja Munde and Dhananjay Munde : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र
Pankaja Munde and Dhananjay Munde
Pankaja Munde and Dhananjay MundeSarkarnama

Political News : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भागवान गडाच्या नारळी सप्ताहाला हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले बहिण-भाऊ सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी डॉ.नामदेव शास्त्री हे देखील तेथे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलीच राजकीय शेरेबाजी रंगली. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आज सप्ताहाच्या सोहळ्यानिमित्त हा दुरावा मिटल्याचेही दिसून आले.

Pankaja Munde and Dhananjay Munde
Sharad Pawar : फडणवीस अन् अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा होणार का? प्रश्नावर पवारांची गुगली

मुंडे बहिण भावाच्या राजकीय संघर्षालाही पूर्णविराम मिळाल्याचे संकेत दोघांनी दिले. वैचारिक मतभेद आहे. मात्र, मनभेद नाहीत, अशी एकप्रकारे कबुलीच मुंडे बहीण भावांनी दिली. त्यामुळे पंकजा-धनंजय मुंडेंच्या नात्यातील कडवटपणा संपला असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ''माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंद आहे. धनंजयनंतर माझा चार वर्षांनी जन्म झाला आहे. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं? आम्ही दोघेही पराक्रमी आहोत. कारण धनंजयचा पराक्रम आणि माझा पराक्रम वेगळा आहे. दोघांचा पक्ष वेग-वेगळा आहे. आम्ही दोघेही एकाच पाठीवरती जन्माला आलोत. त्यामुळे आमचे भविष्य काही वेगळे असेल. त्यामुळे काही वेळ वाट पाहा'', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ''आमच्या बहीण भावाच्या नात्यांतील काही अंतर का होईना पण ते या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने कमी झाले आहे. आम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या विचाराने काम करत आहोत. आमचे विचार वेगवेगळे असले तरी घरामधील संवादामध्ये तूसभरही अंतर नसले पाहिजे. आता ते अंतर कमी झाले. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्तीबाबत कुणीही संशय घेण्याचे कारण नाही'', असं धनंजय मुंडे म्हणाले.

Pankaja Munde and Dhananjay Munde
Karmala News अजितदादांची २०१९ मध्ये ऑफर असलेले रामदास झोळ २०२४ मध्ये करमाळ्यातून विधानसभा लढणार

''आमचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र, आमचे सुईच्या टोका एवढे देखील वैर नाही. मोठा भाऊ या नात्याने बहिणीने भगवानगडासाठी जे सांगितले ते मी सर्व करेल. जे होतं ते बऱ्यासाठीच होतं. पंकजाताई दोन वेळा आमदार झाल्या. मंत्री देखील झाल्या. तसं मी ही आमदार झालो, विरोधीपक्ष नेताही झालो, आणि मंत्रीही झालो. जर असं झालं नसतं तर आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, असं म्हणत आता तुम्ही समजून घ्या '', असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com