EVM Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : निवडणूक अधिकाऱ्यांची धावाधाव; मतदानाच्या सुरुवातीलाच 28 ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

Chhatrapati Sambhajinagar Election Voting Machine Issues: पहिल्या दोन तासात जिल्ह्यात २८ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. त्या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Polling Voter Turnout: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण ३२ लाख २ हजार मतदार आज दिवसभरात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत . त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. तरी देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असता ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे प्रकार आढळून आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता.२०) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळले. त्यामुळे पहिल्या दोन तासात जिल्ह्यात २८ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. त्या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रशासनाने खबरदारी म्हणून लगेचच तेथील आधीच्या ईव्हीएम बदलून राखीव कोट्यातील ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. शहरी भागातील १०० टक्के मतदान केंद्रांवर तर ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून या मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे , तिथल्या प्रत्येक हालचाली या नियंत्रण कक्षातून टिपल्या जात आहेत. वेब कास्टिंग होत असलेल्या या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

संभाजीनगर शहरात असूनही अतुल सावे, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, राजू शिंदे हे प्रमुख उमेदवार स्वतःला मतदान करू शकले नाहीत, कारण ते ज्या मतदारसंघांमध्ये उभे आहेत त्या मतदारसंघांमध्ये त्यांचे मतदार यादीत नाव नव्हते. अतुल सावे हे भाजपचे संभाजीनगर पूर्व विधानसभेचे मतदार आहेत मात्र त्यांचं मतदान मध्य विधानसभा मतदारसंघात आहे.

सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत मात्र त्यांचं मतदान हे छत्रपती संभाजीनगर शहरात आहे.राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर त्यांचे मतदान संभाजीनगर पूर्व मतदारसंघात आहे.इम्तियाज जलील हे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत मात्र त्यांचं मतदान हे मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT