Cash for Vote : पैशांचे घबाड सापडले तेथे हॉटेल रूमवरील मंत्रालयातील "ती" अधिकारी कोण? उमेदवाराशी काय संबंध ?

1.98 crore seized nashik hotel room woman official linked to ministry: "नाशिक मध्ये जप्त केलेल्या १.९८ कोटी रुपये असलेल्या हॉटेलच्या खोलीत होती मंत्रालयातील एक महिला अधिकारी
Officer Alka Ahirrao in Hotel room
Officer Alka Ahirrao in Hotel roomSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक मध्ये एका हॉटेलमध्ये सुमारे दोन कोटी रुपये सापडले. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व प्राप्तिकर विभागाने त्याची झाडाझडती सुरू केली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली.

दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीनुसार तपासणी झाली. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी जयंत साठे यांच्या नावाने खोली बुक होती. या 706 क्रमांकाच्या खोलीत सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड आढळली.

Officer Alka Ahirrao in Hotel room
Maharashtra Election Voter Turnout: पालकमंत्री दादा भुसे, मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात मतदान संथ

ही रोकड कशासाठी आणली होती? याचा खुलासा साठे करू शकले नाहीत. मात्र त्यांनी संबंधित पैसे आपलेच असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. त्याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्राप्तिकर विभाग त्याचा तपास करीत आहे.

Officer Alka Ahirrao in Hotel room
Nashik Politics: सत्ताधारी नेत्याच्या गाडीत 1.98 कोटींची रोकड; तारांकीत हॉटेलच्या खोलीत चार तास तपासणी !

या तपासात आणि प्रत्यक्ष घटनास्थळी आयोगाच्या नियमानुसार केलेल्या चित्रीकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात केवळ दोन बॅगांत पैसे आढळले. त्या आधी तेथे सत्ताधारी पक्षाचे विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे अन्य पैसे कोणाला दिले तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

या चौकशीत चित्रीकरण देखील केले जाते. तपासणी करताना संबंधित खोलीत सध्या पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या आणि मंत्रालयात अधिकारी असलेल्या अलका अहिरराव या बसलेल्या आढळल्या. चित्रीकरण सुरू होताच त्यांनी आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अलका अहिरराव या देवळाली मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या भगिनी आहेत.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा मंत्रालयातील ही महिला अधिकारी ताथे काय करत होती? तीचे तिथे काय काम होते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे घटनेनंतर दोन दिवसांनी या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. ही कार्यवाही सुरू असताना संबंधित व्यक्ती दूरध्वनी वरून कोणाशी तरी संवाद करीत होती.

पलीकडून त्यांना सूचना केल्या जात होत्या. त्यानुसार ते संबंधितांकडे माहिती घेऊन समोरच्या व्यक्तीला देत होते. त्यात त्यांनी ज्यांना दूरध्वनी केला त्यांना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने काय कारवाई केली असे त्यांनी सांगितले.

आता या प्रकरणात अन्य कोणी सरकारी अधिकारी तर संलग्न नाही ना, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राजकीय दबावातून हा तपास अर्धवट राहतो की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जिलानी यांना संबंधित घटनेची माहिती मिळाली होती. त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना नाशिकच्या निरीक्षकांचा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. संबंधित निरीक्षकांना कळविल्यानंतर ही कारवाई झाली.

याबाबत श्री जीलानी यांनी देवळाली मतदार संघाच्या उमेदवार राजश्री अहिरराव व काही माजी नगरसेवक देखील तेथे उपस्थित होते, असा दावा केला. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com