Rajesaheb Deshmukh | Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Bogus Voting in Parli : परळीत बोगस मतदानात मुंडेंचे कार्यकर्ते आघाडीवर; देशमुखांच्या आरोपाने खळबळ

Political controversy in Parli as bogus voting claims emerge: बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचा आरोप 'मविआ'चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला.

Pradeep Pendhare

Beed News : परळी विधानसभेच्या हायहोल्टेज निवडणुकीत सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली. परंतु मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तालुक्यातील धर्मापुरी आणि शहरातील जलालपूर इथं बोगस मतदान होत आहे.

महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली. याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे.

'परळी विधानसभेच्या निवडणुकीत (Election) प्रशासनाच्या सहकार्याने अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असून तालुक्यातील धर्मापुरी मतदान केंद्रावर सीसीटिव्ही बंद करुन आणि शहरातील जलालपूर येथे महिलांना मतदान करू देत नाहीत, जे मतदान करत आहेत त्या़चे मतदान बघितले जात आहे', असा आरोप 'मविआ'चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला.

'संपूर्ण मतदारसंघात प्रशासनाच्या सहकार्याने बोगस मतदान प्रक्रिया महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. याला पायबंद घाला याची रितसर तक्रार देणार आहे', असा देखील इशारा राजेसाहेब देशमुख यांनी दिला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी परळी शहरातील मतदान केंद्रावरील ज्या ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत या ठिकाणी बोगस मतदान सुरू असून शहरातील केंद्र क्रमांक 141, 168, 170 या केंद्रावरील वेबकास्ट प्रक्षेपण सकाळी 7 ते 10 बंद असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे, असे सांगितले.

'आमदार निवडून येईल, पण हा हुकूमशाहीचा आमदार होईल, त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. एका-एका बुथवर 20-20 प्रतिनिधी समोरील उमेदवाराचे आहेत, आमचा एक प्रतिनिधी काय करणार, यासाठी आम्ही तक्रार दाखल करत आहोत', असेही बहादूर भाई यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT